शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

कदाचित सिंगल स्क्रीन थिएटर्स पुन्हा दिसणार नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:07 IST

- १५ महिन्यांपासून लॉकडाऊन : कोरोनाने काढले चित्रपटगृहांचे दिवाळे - वीजबिल, पाणीबिल, मेण्टेनन्सचा भार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...

- १५ महिन्यांपासून लॉकडाऊन : कोरोनाने काढले चित्रपटगृहांचे दिवाळे

- वीजबिल, पाणीबिल, मेण्टेनन्सचा भार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्राला आणि देशाला सगळ्यात जास्त करमणूक कर देणारी एंटरटेन्मेंट इंडस्ट्री कोरोनाने नेस्तनाबूत केली आहे. या इंडस्ट्रीचा सगळ्यात मजबूत असा कणा समजल्या जाणाऱ्या चित्रपटगृहांचे दिवाळे लॉकडाऊनने काढले आहे. गेल्या १५ महिन्यांपासून चित्रपटगृहे बंद असल्याने मालकांसोबतच मॅनेजर, तिकीट कलेक्टर, सफाई कर्मचारी, वाहनतळ कर्मचारी आदींची वाताहत झाली आहे. अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स कदाचित पुन्हा दिसणार नाहीत, अशी स्थिती आहे.

शहरात मुख्य धारेतील चित्रपट प्रदर्शित करणारी २०च्यावर चित्रपटगृहे आहेत. सिंगल स्क्रीन थिएटर्ससोबतच मल्टिप्लेक्स व मिनीप्लेक्सचा समावेश होतो. विशेष म्हणजे, शहराचा वाढता आवाका व मनोरंजन क्षेत्राकडे नागरिकांचा वाढता कल बघता अनेक मिनीप्लेक्स थिएटर्सची पायाभरणीही झाली आहे. सगळे सुरळीत होत असतानाच कोरोनाचे आक्रमण झाले आणि देशभरात टाळेबंदी सुरू झाली. मार्च २०२० पासून सुरू झालेली ही टाळेबंदी चित्रपटगृहांसाठी अद्यापही उघडलेली नाही. वेगवेगळ्या राज्यांत थोड्याथोडक्या प्रमाणात मुभा मिळाली असली तरी चित्रपटक्षेत्र एका राज्यापुरते किंवा एका शहरापुरते नसल्याने ती मुभा उसंत देणारी नव्हती. त्याचा फटका अद्यापही बसत आहे. सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे बंद असली तरी वीजबिल, पाणीबिल, दररोजचा मेण्टेनन्स, साफसफाई आणि करभरणी नियमित सुरूच आहे. काही चित्रपटगृह मालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही काढलेले नाही. मात्र, उत्पन्नच नसल्याने अनेकांचे पगार कमी केले आहेत तर काहींना पर्याय नसल्याने कर्मचाऱ्यांना मोकळी वाट केली आहे. काहींनी तर चित्रपटगृहे बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे.

----------------

पॉइंटर्स

नागपुरातील सिंगल स्क्रीन थिएटर्स

पंचशिल, राजविलास, जानकी, स्मृती, लिबर्टी, जयश्री, सुदामा, लक्ष्मी, आशीर्वाद, विजय, क्रिष्णा, अलंकार आदी.

नागपुरातील मल्टिप्लेक्स

कमाल सिनेप्लेक्स, सिनेमॅक्स सिनेमाज इटर्निटी मॉल, आयनॉक्स सिनेमा जसवंत तुली, पीव्हीआर सिनेमाज एम्प्रेस मॉल, कार्निव्हल सिनेमा संगम ॲडलॅब्स आदी.

नागपुरातील मिनीप्लेक्स

बुटी सिनेप्लेक्स, के सेरा सेरा मिनीप्लेक्स आदी. काही नव्या मिनीप्लेक्सची पायाभरणी झालेली आहे.

------------------

अनलॉकही तारू शकले नाही

मार्च २०२० पासून सुरू झालेले लॉकडाऊन सिनेमागृहांसाठी नोव्हेंबरपर्यंत कायम होते. जागतिक रंगभूमी दिनाची भेट देत महाराष्ट्र सरकारने मनोरंजन क्षेत्राला अनलॉक केले होते. मात्र, प्रारंभी २५ टक्के व नंतर ५० टक्के आसनक्षमता मारक ठरली. शिवाय, प्रेक्षकांना खेचू शकणारे सिनेमे प्रदर्शित झाले नाहीत. सूरज पे मंगल भारी, विजय दी मास्टर हे सिनेमे नागपुरात रीलिज झाले. पण, आठवड्याच्यावर चालू शकले नाहीत. काही थिएटर्सनी जुने सिनेमे लावले. मात्र, त्याचाही फायदा झाला नाही. फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि थिएटर्स पुन्हा बंद पडले.

-------------

ओटीटी विरुद्ध चित्रपटगृहे

लॉकडाऊन काळात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण रखडले होते. ते पूर्ण झाल्यावरही प्रेक्षकांची शाश्वती नसल्याने अनेकांनी ओटीटीवर आपले सिनेमे प्रदर्शित करून नफा कमावला. मात्र, त्याचा फटका चित्रपटगृहांना बसला. लक्ष्मी, राधे सारख्या चित्रपटांनीही ओटीटीचाच पर्याय निवडला. रुही अब्जा, मुंबई सागासारखे चित्रपट नागपुरात प्रदर्शित होऊच शकले नाहीत. जे सिनेमे प्रदर्शित करण्याचा धोका चित्रपटगृहांनी स्वीकारला. त्यातही प्रेक्षकांनी पाठ दाखविल्याने खर्चाचा मार जादा बसला.

-----------------

शासनाने सहा महिन्यांची सवलत द्यावी

कोरोना संक्रमणामुळे गेल्या १५ महिन्यांपासून सगळ्यात जास्त तोटा कुणाचा झाला असेल तर तो चित्रपटगृहांचा. उत्पन्न बंद आणि खर्च सुरू, अशी स्थिती आहे. शासनाने या संकटापासून काढण्यासाठी किमान प्रत्येक गोष्टीत सहा महिन्यांची सवलत देणे अपेक्षित आहे. हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात कर देणारे आहे, हे शासनाने समजून घ्यावे.

- प्रतीक मुणोत, संचालक, पंचशिल सिनेमा

--------------

चित्रपटगृहे हा पॅन इंडियाचा प्रश्न

नागपुरात अनलॉक झाले म्हणजे चित्रपटगृहांना चांगले दिवस येतील, असे नाही. चित्रपटगृहे हा पॅन इंडियाचा प्रश्न आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यावर चित्रपटगृहांचे भविष्य आहे. मात्र, अजूनही शासन निर्देश स्पष्ट नाहीत. या क्षेत्रावर पेंटर्स, बॅनर क्रिएटर्स, डिस्ट्रिब्युटर्स निर्भर आहेत. त्याचा विचार सरकारने करावा.

- राजेश राऊत, व्यवस्थापक, कार्निव्हल सिनेमा

-----------

सिंगल स्क्रीन थिएटर्स बंद पडण्याच्या मार्गावर

लॉकडाऊनमुळे सिंगल स्क्रीन थिएटर्स अनेकांनी बंद करून दुसरा व्यवसाय निवडण्याचा प्रयत्न केला आहे. अनलॉक झाल्यावर कदाचित नियमित दिसणारी थिएटर्स पुन्हा दिसणार नाहीत, अशी स्थिती आहे. काहींनी तग धरला असला तरी आगामी काळात त्यांना कायमचे टाळे लागण्याची चिन्हे आहेत. हे नुकसान एका मालकाचे नाही तर अनेकांच्या रोजगाराचे असणार आहे.

- आलोक तिवारी, मालक, जानकी सिनेमा

..........................