शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

माया गँग अडकली

By admin | Updated: June 12, 2014 01:09 IST

गणेशपेठ येथील एसटी स्टॅण्ड चौकात दिवसाढवळ्या झालेल्या सूरज जयस्वाल याच्या खुनातील फरार माया गँगचे सहा सदस्य अजनी पोलिसांच्या हाती लागले आहेत. स्वत:ला वाचविण्यासाठी सूरजचा खून केल्याचे

अल्पवयीनसह सहा अटकेत : सूत्रधारास वाचविण्याचा प्रयत्न नागपूर : गणेशपेठ येथील एसटी स्टॅण्ड चौकात दिवसाढवळ्या झालेल्या सूरज जयस्वाल याच्या खुनातील फरार माया गँगचे सहा सदस्य अजनी पोलिसांच्या हाती लागले आहेत. स्वत:ला वाचविण्यासाठी सूरजचा खून केल्याचे आरोपी सांगत असले तरी मुख्य सूत्रधाराला वाचविण्यासाठीच नवी कहाणी सांगितली जात असल्याची माहिती आहे. अनुराग ऊर्फ अन्या वाघमारे (२३), स्वप्नील ऊर्फ बाबू भोयर (२२), आकाश ऊर्फ टिंग्या चव्हाण (२३), शुभम ऊर्फ पेट्या गजघाटे (२२), आणि त्याचे दोन अल्पवयीन साथीदार, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. सर्व आरोपी अजनी पोलीस ठाणे हद्दीतील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीत राहतात. ९ जून रोजी दुपारी एसटी स्टॅण्ड चौकात सूरजचा खून करण्यात आला. पोलीस चौकीजवळच झालेल्या या खुनामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली. एसटी स्टॅण्ड चौकातील पोलीस चौकीत तैनात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले. प्राथमिक तपासात ही हत्या माया गँगद्वारा करण्यात आल्याची माहिती पुढे आली. यानंतर गणेशपेठ आणि अजनी पोलीस संयुक्तपणे आरोपीच्या शोध घेत होते. अजनी पोलिसांना बुधवारी दुपारी आरोपी बेसा येथे लपून असल्याची माहिती मिळाली. या आधारावर उपायुक्त चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार एल.जी. डुंबरे आणि उपनिरीक्षक रवी राजुलवार यांनी कारवाई करून आरोपीला अटक केली. सूत्रानुसार सूरज हा ठाकूर गँगशी जुळलेला होता. आरोपी माया गँगचे सदस्य आहेत. माया गँगला चिंतलवार समूह आणि तुरुंगात बंदिस्त असलेला अमर लोहकरे चालवितात. ठाकूर गँग आणि चिंतलवार-लोहकरे या दोन्ही गँगमध्ये अनेक दिवसांपासून वैर सुरू आहे. काही दिवसांपूर्वी लोहकरे विरुद्ध तुरुंगातून हप्ता वसुली केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून दोन्ही गँग एकमेकांच्या विरोधात उभी ठाकल्या आहेत. मृत सूरजने अनुराग ऊर्फ अन्यावर गेल्या आठवड्यात हल्ला केला होता. एका वर्षापूर्वी शुभम ऊर्फ पेट्यालाही जखमी केले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपीनुसार सूरज हा त्यांची हत्या करणार होता. त्यामुळे स्वत:चा जीव वाचविण्यासाठीच त्याचा खून करण्यात आला. या खुनातील आरोपी मिहीर, सलमानसह आणखी पाच ते सहा आरोपीचा शोध घेतला जात आहे. आरोपी गणेशपेठ पोलिसांना सोपविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)