शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अस्थिकलशची भव्य मिरवणूक : हजारो नागरिकांनी घेतले दर्शन

By admin | Updated: October 15, 2015 03:21 IST

तथागत गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थिकलशाचे साक्षात दर्शन झाल्याने नागपूरकर धन्य झाले आहेत.

नागपूर : तथागत गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थिकलशाचे साक्षात दर्शन झाल्याने नागपूरकर धन्य झाले आहेत. २५०० वर्षांपासून जतन करून ठेवलेला हा अस्थिकलश श्रीलंकेवरून नागपूरकरांच्या दर्शनासाठी बुधवारी आणण्यात आला होता. शहरातून या अस्थिकलशाची भव्य मिरवणूक काढल्यानंतर बेझनबाग मैदानात तो नागरिकांसाठी दिवसभर दर्शनासाठी ठेवण्यात आला. यावेळी बौद्ध समाजबांधवांसह हजारो नागरिकांनी या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया, बुद्धिस्ट स्पिरिच्युअल पार्क आणि बुद्धिस्ट फाऊंडेशन यांच्या पुढाकारातून श्रीलंकेच्या पुरातत्त्व विभागाने जतन करून ठेवलेला तथागत गौतम बुद्धांचा अस्थिकलश भारतात आणण्यात आला. बुधवारी मुंबईहून तो विमानाने नागपूरच्या विमानतळावर आणण्यात आला. यावेळी हजारो नागरिक विमानतळावर स्वागतासाठी उपस्थित होते. विमानतळावर अस्थिकलशाचे स्वागत केल्यानंतर विमानतळ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर एका भव्य रथावर अस्थिकलश ठेवून त्याची शहरात मिरवणूक काढण्यात आली. विमानतळावरून अस्थिकलशाचा रथ थेट संविधान चौकात पोहोचला. या ठिकाणी हजारो नागरिकांनी अस्थिकलशाचे स्वागत करून दर्शन घेतले. येथून गिट्टीखदान चौक, बोरगाव चौक, जाफरनगर, पागलखाना चौक, कडबी चौक मार्गे हा रथ बेझनबाग येथील मैदानात पोहोचला. दरम्यान रस्त्यात ठिकठिकाणी अस्थिकलशाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले होते. प्रत्येक चौकात अस्थिकलशाचे स्वागत करण्यात आले. हजारोंच्या संख्येने नागरिक अस्थिकलशाच्या दर्शनासाठी उभे होते. युवा भीम मैत्री संघाच्यावतीने बेझनबाग मैदानात भव्य स्टेज उभारण्यात आला होता. यावर तथागत गौतम बुद्धांचा अस्थिकलश नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. सायंकाळपर्यंत बौद्ध समाजबंधवांसह हजारो नागरिकांनी या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेतले. (प्रतिनिधी)महापौरांनी केले अस्थिकलशाचे स्वागत बुधवारी सकाळी ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तथागत गौतम बुद्धांच्या अस्थिकलशाचे आगमन झाले. या अस्थि श्रीलंकेवरून मुंबईला आणि मुंबईवरून त्या विमानाने नागपुरात आल्या. महापौर प्रवीण दटके यांनी श्रीलंकेच्या शिष्टमंडळासह तथागत गौतम बुद्धांच्या अस्थिकलशाला पुष्पहार अर्पण करून शहरवासीयांतर्फे स्वागत केले. याप्रसंगी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खा. रामदास आठवले, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, आ. प्रकाश गजभिये, डॉ. मिलिंद माने, नगरसेवक संजय बोंडे, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील, शहराध्यक्ष भीमराव फुसे, मनोहर दुपारे, शंकरराव ढेंगरे, राजू बहादुरे, अशोक कोल्हटकर, डॉ. मिलिंद जीवने, मनोज सांगोळे उपस्थित होते. विमानतळावरून काढण्यात आलेल्या अस्थिच्या मिरवणुकीतही महापौर सहभागी झाले होते.हिरेजडित सुवर्ण अस्थिकलशश्रीलंकेतील राजगुरुजी सुभूती महाविहार येथे जतन करून ठेवण्यात आलेल्या तथागत गौतम बुद्धांच्या अस्थी ज्या कलशात जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत, तो हिरेजडित सुवर्ण कलश आहे. संपूर्ण कलशाचे जवळपास १५ किलो वजन आहे. या अस्थिकलशासह श्रीलंकेतील बौद्ध भिक्खू संघासह ३० प्रतिनिधीसुद्धा आले आहेत. रात्रभर चालले महापरित्राणपाठ बेझनबाग मैदानात बुधवारी सायंकाळी ७ वाजता महापरित्राण पाठ आयोजित करण्यात आला. भदंत ज्ञानज्योती यांच्या नेतृत्वात भिक्षू संघ उपस्थित होते. गुरुवारी सकाळी ५ वाजेपर्यंत परित्राण पाठ सुरू होते. भदंत ज्ञानज्योती यांनी यावेळी धम्म प्रवचन दिले. यावेळी नागपूरकरंसह राजकोट, राजस्थान, मुंबई, पुणे, सावनेर, भंडारा, काटोल आदी भागातूनही अनुयायी उपस्थित होते. भीम मैत्रिय संघातर्फे जितेंद्र बन्सोड़, निशांत नांदगांवे, संघपाल उपरे, हितेश उके, दीपक वासे, अजय चव्हाण, विवेक निकोसे, विनोद वाल्दे आदींनी परिश्रम घेतले.