शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

चामुंडी बारूद कंपनीत भीषण स्फोट, चार महिलांसह पाच ठार चार गंभीर जखमी

By जितेंद्र ढवळे | Updated: June 13, 2024 16:10 IST

या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत आणि शोक संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. ही कंपनी नेरी ग्रामपंचायत क्षेत्रात येते. 

नागपूर (नरेश डोंगरे): नागपूर-अमरावती महा महामार्गालगतच्या  धामना गावाजवळ असलेल्या चामुंडी एक्सप्लोसिव प्रा. ली. कंपनीत गुरुवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. यामुळे चार महिला कामगारांसह पाच जणाचा जागीच मृत्यू झाला. तर चार गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत आणि शोक संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. ही कंपनी नेरी ग्रामपंचायत क्षेत्रात येते. 

नागपूर अमरावती महामार्गावर नागपूर पासून 25 किलोमीटर अंतरावर धामना हे गाव असून येथे बारूद तसेच फटाक्याच्या वाती निर्माण केल्या जातात. कंपनीत नेहमीप्रमाणे आज सकाळपासून बारूद पॅकिंग व हाताळणीचे काम सुरू असताना दुपारी 1 वाजताच्या सुमारास अचानक भीषण स्फोट झाला आणि त्यात आत मधील सर्वजण गंभीर जखमी झाले. मोठा आवाज झाल्यामुळे आजूबाजूच्या गावातील हजाराच्या संख्येत नागरिक या स्फोटाच्या कारखान्याकडे धावले. त्यांनी जखमींची मदत करण्याचे प्रयत्न केले. रुग्णवाहिका घटनास्थळी  बोलवून सर्व जणांना नागपूरला रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल त्यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले. पोलिसांचा ताफा आणि स्फोटक विशेषज्ञ पोहोचले. त्यांनी  घटनास्थळी पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 

मृताची नावे -

1) प्रांजली किसना मोदरे (22) रा. धमना 

2) वैशाली आनंदराव शिरसागर ( 21) रा. धमना 

3) प्रांजली श्रीकांत फलके (21) रा. धमना 

4) मोनाली शंकर अलोने (27) रा. धमना 

5) पन्नालाल बंदेवार ( 69) रा. सातनवरी

जखमीची नावे - 

1) शीतल चटप ( 30) रा. धामना 

2) दानसा मरस्कोल्हे ( 26) रा.मध्यप्रदेश 

3) श्रद्धा पाटील ( 22) रा. धामना 

4) प्रमोद चवारे ( 25) रा. नेरी.

टॅग्स :nagpurनागपूरfireआगBlastस्फोट