शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; ऑटोचालकासह ४ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 12:11 IST

Nagpur News अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर एकाच रात्री दोन वेळा सामूहिक अत्याचार केल्याचे प्रकरण पुढे आले आहे.

ठळक मुद्देपीडित मुलीवर दुसऱ्यांदा मेयो रुग्णालय चौकात ऑटोमध्येच अत्याचार करण्यात आला. मेयो रुग्णालय चौक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील आहे. येथे रात्री पोलिसांची गस्त होत असते. अशात रस्त्यावरच अत्याचार होत असेल तर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आ

 लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर एकाच रात्री दोन वेळा सामूहिक अत्याचार केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. २९ जुलैच्या रात्रीची ही घटना असून, शहर पोलिसांत खळबळ उडाली आहे. सीताबर्डी पोलिसांनी सूत्रधार ऑटोचालकासह चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये मो. शाहनवाज ऊर्फ साना मो. रसीद (२५), मासूम शाह तकिया, मो. तौसीफ मो. युसूफ (२६), मो. मुशीर (२३) बकरामंडी, मोमीनपुरा व अन्य एक आरोपी आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

पीडिता १७ वर्षीय अल्पवयीन असून गरीब कुुटुंबातील आहे. वहिनीने रागवल्याने ती २९ जुलै रोजी रात्री घराबाहेर पडली. मेडिकल चौकातून तिने एका ओळखीच्या ऑटोचालकाला सीताबर्डी सोडण्यास सांगितले. त्याने तिला मानस चौकात सोडून दिले. तिथे या प्रकरणाचा सूत्रधार ऑटोचालक साना याची तिच्यावर नजर पडली. त्याने मदतीचा हात पुढे करून तिला ऑटोत बसविले व मोमिनपुऱ्यात घेऊन गेला. दरम्यान तिला दारूसुद्धा पाजली. तिला एका खोलीत घेऊन गेला व तीन मित्रांना पुन्हा बोलाविले. आरोपी सानासह अन्य तिघांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला पुन्हा मेयो रुग्णालयासमोर सोडून दिले. तिथे दोन ऑटोचालकांची तिच्यावर नजर पडली. त्यांनी सुद्धा तिच्यावर सामूहिक अत्याचार केला व फरार झाले. ती मेयो रुग्णालय चौकात मदत मागत होती. दरम्यान दोघांनी आपल्या गाडीवर तिला रेल्वे स्टेशनवर सोडून दिले.

रात्री उशिरा जीआरपीच्या गस्त घालणाऱ्या पथकाला ती रेल्वे स्टेशनवर आढळली. त्यांनी तिला महिला बालगृहात पाठविले. तिथे बाल कल्याण समितीपुढे अत्याचार झाल्याचे सांगितले. समितीच्या सूचनेनुसार जीआरपीने तिचा बयाण नोंदवून घेतला. तपासात शाहनवाज ऊर्फ साना याची माहिती मिळाली. जीआरपीचे एपीआय ओमप्रकाश भलावी यांच्या पथकाने साना व दोन आरोपींना अटक केली. रविवारी सायंकाळी सीताबर्डी पोलिसांना सूचना दिली. घटनेची माहिती मिळताच प्रभारी डीसीपी विवेक मसाळ तसेच एसीपी तृप्ती जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांनी तपास सुरू केला. सीताबर्डी पोलिसांनी चवथ्या आरोपीलाही अटक केली. त्यांच्यावर बलात्कार, पोक्सो, अपहरण, अ‍ॅट्रॉसिटी अन्वये गुन्हे दाखल केले.

- पीडितेवर दुसऱ्यांदा झाला अत्याचार

पीडित मुलीवर यापूर्वीही सामूहिक अत्याचार झाला आहे. यापूर्वी तिच्यावर इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्याचार झाला होता. अनेक दिवस महिला बालगृहात राहिल्यानंतर ती घरी परतली होती; परंतु घरच्यांचा तिच्यासोबत नेहमीच वाद होत होता. घटनेतील चार आरोपी ऑटोचालक आहे. तर दोन कुली असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व रेल्वे स्थानकावरून व्यवसाय करतात.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी