शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत मास्कचा काळाबाजार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 10:39 IST

औषध विक्रेत्यांकडे ‘एन-९५’ मास्कसोबतच सर्जिकल व साध्या मास्कची मागणी वाढली आहे. यामुळे गेल्या महिन्यात १० रुपयात विकलेले साधे मास्क आता १५ रुपयांत मिळत आहेत.

ठळक मुद्दे१५० रुपयाचा मास्क २१० रुपयात विक्रीगांधीबाग दवाबाजारमधील वास्तव

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात एकीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असताना दुसरीकडे याचा फायदा घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आता तर नागपुरातच एक रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने घराघरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक जण प्रतिबंधक उपाय करण्याच्या प्रयत्नात आहे. परिणामी, औषध विक्रेत्यांकडे ‘एन-९५’ मास्कसोबतच सर्जिकल व साध्या मास्कची मागणी वाढली आहे. यामुळे गेल्या महिन्यात १० रुपयात विकलेले साधे मास्क आता १५ रुपयांत मिळत आहे, तर ‘एन-९५ मास्क’ ज्याची किमत ‘एमआरपी’नुसार १५० आहे ते जीएसटी मिळून २१० रुपयांना विकले जात आहेत.विशेष म्हणजे, नुकतेच ‘लोकमत’ने ‘स्टिंग आॅपरेशन’ करून मास्कच्या काळाबाजाराचे वास्तव उघडकीस आणले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी याची दखल घेऊन काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले. परंतु त्यानंतरही ‘औषध प्रशासन’ (एफडीए) व वैधमापन शास्त्र विभागाला हे थांबविण्यास अद्याप यश आले नसल्याचे वास्तव आहे.‘एन-९५’ मास्कचा वापर केवळ रुग्ण, जवळचे नातेवाईक, उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका व सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. परंतु सामान्यांपासून ते एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करणाऱ्यांकडून या मास्कची मागणी वाढली आहे. शहरात या मास्कचा तुटवडा पडला आहे. यामुळे अनेक जण गांधीबाग येथील दवाबाजारात गर्दी करीत आहेत. याच बाजारातील एका ‘सर्जिकल स्टोअर्स’ने ‘बॅच क्र. १७०८जी१७७एनई’ एन-९५ मास्क ज्याची किमत एमआरपीनुसार १५० असताना त्याला २०० रुपये, व ‘जीएसटी’ १० रुपये असे एकूण २१० रुपये किमतीत विकत आहे. एका ग्राहकाला पाच मास्क १०५० रुपयात विकले. याची पावतीही दिली आहे. यावरून मास्कचा काळाबाजार करणारे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही जुमानत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.

शुक्रवारपासून कारवाईजिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ‘एफडीए’ व ‘वैधमापन शास्त्र’ विभागाची गुरुवारी बैठक घेतली. त्यांनी मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार शुक्रवारपासून ही कारवाई करण्यात येईल.-धनवंत कोवे, उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र विभाग

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस