शहीद भूषण सतई यांना काटोलवासियांनी दिला अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 12:51 PM2020-11-16T12:51:40+5:302020-11-16T14:52:44+5:30

Nagpur News martyr जमू काश्मीर मधील गुजर सेक्टर मध्ये पाकिस्तान सैनिकांनी शुक्रवारी सिझ फायरचे उल्लंघन करून केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांत काटोल येथील सैनिक भूषण सतईचे पार्थिव सोमवार सकाळी 10.25 ला त्याच्या फैलपुरा येथील घरी पोहचले.

Martyr Bhushan Satai was given his last farewell by the people of Katol | शहीद भूषण सतई यांना काटोलवासियांनी दिला अखेरचा निरोप

शहीद भूषण सतई यांना काटोलवासियांनी दिला अखेरचा निरोप

googlenewsNext
ठळक मुद्देशहीद जवान भूषण सतईवर लष्करी इतमामात मानवंदनाब्रिगेड ऑफ गार्ड रेजिमेंटच्या परेड ग्राऊंडवर गार्ड ऑफ ऑनर राज्य शासनातर्फे पालकमंत्र्यांनी वाहिली श्रध्दांजली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर :  जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेले काटोलचे सुपुत्र शहीद नायक भूषण सतई यांना कामठी येथील ब्रिगेड ऑफ गार्ड रेजिमेंटच्या गरुडा परेड ग्राऊंडवर अखेरची मानवंदना देण्यात आली.
    राज्य शासनातर्फे राज्याचे उर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शहीद भूषण सतई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली अर्पण केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. शहीद भूषण सतई हे मुळचे काटोलचे असून त्यांच्यावर  लष्करी इतमामात काटोल नगरीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
    उत्तर महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सैन्य विभागाच्या सब एरियाचे प्रमुख मेजर जनरल दिनेश हुड्डा यांनी अभिवादन केले. सैन्यदलाच्या विशेष पथकाकडून पारंपारिक  धुन वाजवून व सशस्त्र दलातर्फे यावेळी गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांनी वीरपुत्राला श्रध्दांजली वाहिली.
    यावेळी ब्रिगेडीयर संदीप कुमार, ब्रिगेडीयर दिपक शर्मा, कमांडर श्रीमती मनिषा काठे, कमांडर अलोक बेरी, आर. बी. बिराजदार यांचेसह जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर आदीनी पुष्पचक्र अर्पण केले.
    काश्मिर खोऱ्यातील गुरेज सेक्टरमध्ये मागील शुक्रवारी पाकिस्तानने केलेल्या हल्यात भारतीय लष्काराचे चार जवान शहीद झाले होते. यामध्ये काटोल येथील भूषण रमेश सतई यांना वीरमरण आले. कामठी येथील लष्करी हॉस्पिटलमधून शहीदाचे पार्थिव सेनादलाच्या गरुडा परेड येथील अमर योध्दा स्मारकाजवळ ठेवण्यात आले. यावेळी सेनादलाकडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर वीर सुपुत्राचे पार्थिव त्यांच्या मुळगावी काटोल येथे संपूर्ण सन्मानपूर्वक रवाना झाले यावेळी शहीद सुपुत्राचे निकटवर्तिय उपस्थित होते.

नागरिकांसह घरच्यांनी शहीद जवानाला मानवंदना दिली. या क्षणी उपस्थित्यांचे मन गहिवरून आल्याचे चित्र दिसत होते. नागरिकांनी शहीद भूषण अमर राहे व भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. चिडलेल्या नागरिकांनी पाकिस्तान विरुध्द निषेधही नोंदविला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत काटोल शहरातील मुख्य रस्त्यांनी त्याचे पार्थिव घेऊन अंत्ययात्रा काढण्यात आली. यात आबालवृद्धांचा व महिला भगिनींचा समावेश होता.

Web Title: Martyr Bhushan Satai was given his last farewell by the people of Katol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Martyrशहीद