लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुखवस्तू कुटुंबातील महिलेने पतीच्या मित्रांच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. पल्लवी राजू लागुलवार (वय ३५) असे मृत महिलेचे नाव असून ती अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिल रोडवर राहत होती. या घटनेमुळे सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.पल्लवी यांना दोन मुले एक मुलगी आहे. त्यांचे पती राजू नागुलवार बिल्डर आहे. अंबाझरीतील हिल रोडवर मॅजिस्टीक हिल मध्ये ४०१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये ते राहतात. त्यांच्याकडे राजू यांच्या मित्रांची नेहमीच वर्दळ असल्याचे सांगितले जाते. वरवर सर्व व्यवस्थित दिसत असताना पल्लवी काही दिवसांपासून अस्वस्थ होत्या. चर्चेनुसार, राजू यांच्या काही मित्रांकडून पल्लवी यांना शारीरिक आणि मानसिक त्रास होता. मित्रांच्या वाईट नजरेला कंटाळलेल्या पल्लवी यांनी गुरुवारी मध्यरात्री गळफास लावून घेतला. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली. ती पोलिसांनी जप्त केली. त्यात पतीच्या मित्रांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे पल्लवी यांनी नमूद केल्याचे समजते. या माहितीला अंबाझरीचे ठाणेदार भीमराव खंदाळे यांनी दुजोरा दिला आहे. ही आत्महत्या अनैतिक संबंधातून घडल्याचेही पोलीस सांगत आहेत. राजू नागुलवार यांचे रात्री ९ वाजेपर्यंत बयाण झाले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात प्रणित विजय पवार (वय ३८, रा. राजनगर) यांच्या सूचनेवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली. पल्लवीच्या नातेवाईकांनी तक्रार दिल्यास गुन्ह्याचे स्वरूप बदलू शकते, असेही अंबाझरी पोलिसांनी सांगितले.
नागपुरात पतीच्या मित्रांच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:39 IST
सुखवस्तू कुटुंबातील महिलेने पतीच्या मित्रांच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. पल्लवी राजू लागुलवार (वय ३५) असे मृत महिलेचे नाव असून ती अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिल रोडवर राहत होती. या घटनेमुळे सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
नागपुरात पतीच्या मित्रांच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
ठळक मुद्देगळफास लावला : आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी : उलटसुलट चर्चेला उधाण