शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

हद्दच झाली! लग्न एकाशी, गर्भ दुसऱ्याचा आणि घटस्फोटाशिवाय तिसऱ्याशी संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 22:51 IST

Nagpur News कुणा एकाचे मूल पोटात असताना दुसऱ्यासोबत घरठाव मांडून नंतर तिसऱ्याचा हात धरून जाणाऱ्या महिलेच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

ठळक मुद्देफसवणूक करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

नागपूर : सुंदर व संस्कार मुलीशी लग्न झाल्याने आता आयुष्य ‘सेट’ आहे असा विचार करत त्याने भविष्याची स्वप्ने रंगविली होती. मात्र लग्नाच्या काही दिवसातच ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले. हा धक्का कमी होता की काय तर १० तोळे सोन्याचे दागिने घेऊन ती माहेरी निघून गेली. यानंतर न्यायालयात दाद मागितली असता घटस्फोटाअगोदरच तिसऱ्याशी लग्न करून ती मोकळीदेखील झाली. आयुष्याच्या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्या महिलेविरोधात पहिल्या पतीने तक्रार नोंदविली असून, तिच्याविरोधात गुन्हादेखील नोंदविण्यात आला आहे. एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी ही घटना नागपुरात घडली आहे.

रोशन जयंत बिबे (३२, योगी अरविंद नगर) यांचे २०१५ च्या सुरुवातीला मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथील सरिता काळे या तरुणीशी लग्न झाले. लग्नाच्या काही दिवसांनीच ती गर्भवती असल्याची बाब समोर आली व तिने पांढुर्णा येथीलच संजय सातपुते याच्याकडून दिवस गेल्याचे मान्य केले. रोशन व त्याची आई घरी नसताना ती १०५ ग्रॅम सोन्याचे व ५० ग्रॅम चांदीचे दागिने घेऊन माहेरी निघून गेली.

यानंतर तिने छिंदवाडा कौटुंबिक न्यायालयात खोटी तक्रार देत दाद मागितली. मात्र खटला सुरूच असताना तिने सुनील राऊत नामक व्यक्तीशी दुसरे लग्न केले. ही बाब समोर येताच रोशनने यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार घटस्फोट झाला नसताना दुसरे लग्न करणे व इतर बाबींसाठी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेसोबतच नंदा काळे, प्रवीण राऊडकर, संजय सातपुते (सर्व पांढुर्णा) यांच्याविरोधातदेखील गुन्ह्याची नोंद झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी