शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

बाजारपेठा एक दिवसाआड खुल्या ठेवाव्यात : व्यापाऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 23:29 IST

अनलॉक-१ मध्ये ग्राहक खरेदीसाठी बाजारात येत आहेत. पण आॅड-इव्हन फॉर्म्युल्यामुळे त्यांना खरेदीला त्रास होत आहे. ग्राहकांच्या संख्यावाढीसाठी दुकानदारांतर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून संग्रहित डेटातून मॅसेज पाठविले जात आहेत. नागपुरातील बाजारपेठा एक दिवसाआड सुरू ठेवण्यास ग्राहकांना खरेदीची सोय होणार आहे. मनपा आयुक्तांनी दुकानदारांच्या मागणीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केली.

ठळक मुद्देग्राहक मोठ्या संख्येने बाजारात येणार, आयुक्तांनी निर्णय घ्यावा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अनलॉक-१ मध्ये ग्राहक खरेदीसाठी बाजारात येत आहेत. पण आॅड-इव्हन फॉर्म्युल्यामुळे त्यांना खरेदीला त्रास होत आहे. ग्राहकांच्या संख्यावाढीसाठी दुकानदारांतर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून संग्रहित डेटातून मॅसेज पाठविले जात आहेत. नागपुरातील बाजारपेठा एक दिवसाआड सुरू ठेवण्यास ग्राहकांना खरेदीची सोय होणार आहे. मनपा आयुक्तांनी दुकानदारांच्या मागणीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केली.गांधीबाग होलसेल क्लॉथ मार्केटचे अधक्ष अजय मदान म्हणाले, या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. गर्दी टाळण्यासाठी मनपा आयुक्तांनी ऑड-इव्हन फॉर्म्युला दिशेनुसार अवलंबला. पण त्यानंतरही बाजारात गर्दी होत असून त्यावर नियंत्रण नाही. ग्राहकांना पूर्णवेळ आणि आवडीनुसार खरेदी करू देण्यासाठी प्रत्येक बाजारपेठा एक दिवसाआड सुरू ठेवाव्यात. त्यामुळे ग्राहक एखाद्या वस्तूच्या खरेदीसाठी घराबाहेर पडल्यास त्याला आवडीनुसार मनसोक्त खरेदी करता येईल. ऑड-इव्हन फॉर्म्युल्यात ग्राहकाच्या आवडीचे दुकान बंद असेल तर तो अन्य दुकानातून खरेदी करून मोकळा होतो. त्यामुळे संबंधित दुकानदाराला आार्थिक नुकसान होत आहे. प्रशासनाच्या निर्णयामुळे अनेकांना व्यवसायावर पाणी सोडावे लागत आहे.गांधीबाग होलसेल क्लॉथ बाजारात विदर्भातील अन्य जिल्हे आणि तालुक्यातील किरकोळ व्यापारी खरेदीसाठी येतात. त्यांनाही दिवस निवडून आणि पासेस बनवून खरेदीसाठी नागपुरात यावे लागते. तसे पाहता अन्य जिल्हे आणि तालुकास्तरावर बाजारपेठा दरदिवशी खुल्या आहेत. पण ग्राहकांच्या आवडीनिवडी जपणे त्यांना होलसेलमध्ये खरेदीअभावी कठीण झाले आहे. या सर्व बाबींचा विचार करून मनपा आयुक्तांनी बाजारपेठा सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, असे मदान म्हणाले.बाजारपेठा अडीच महिने बंद होत्या. त्यामुळे व्यापाºयांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. बाजार सुरू झाल्यानंतर ग्राहकांनी खरेदीसाठी यावे म्हणून दुकानदारांकडे असलेल्या डेटाचा वापर मेसेजच्या स्वरूपात करीत आहे. सध्या ग्राहक कमी असले तरीही पुढे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर निघतील, असा विश्वास मदान यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Marketबाजारnagpurनागपूर