शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा फुल्ल ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाने १५ ते २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लागू केला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाने १५ ते २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लागू केला आहे. परंतु यापूर्वीपासून शनिवार व रविवारी शहरात बंद पुकारला जात आहे. या आठवड्यातही तो लागू राहील. त्यामुळे लॉकडाऊन हा सोमवारपासून असला तरी उद्या शनिवारपासूनच त्याचा परिणाम दिसून येईल. त्यामुळे आज शुक्रवारी नागरिकांनी शहरातील सर्वच बाजारपेठेत गर्दी केली. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी कुठलीही उपाययोजना दिसून आली नाही. ही गर्दी पाहता कोरोना नियंत्रणात येणार का, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागपुरात आधीच १४ मार्चपर्यंत अंशत: प्रतिबंध लागू होते. तसेच प्रत्येक शनिवार, रविवारी बंद पुकारला जात होता. या शनिवारी व रविवारीसुद्धा तो लागू आहे. त्यामुळे येत्या १५ मार्चपासून लॉकडाऊन सुरु होत असला तरी उद्या १३ पासूनच बंदला सुरुवात होईल. त्यामुळे नागरिकांनी आजच बाजाराच गर्दी केली. सीताबर्डी, महाल, इतवारी, मस्कासाथ, गोकुळपेठ, खामला, जरीपटका, सदर या भागात तर इतकी गर्दी होती की वाहतूक जाम झाली होती.

बॉक्स

कुलर, सलून व हार्डवेअरच्या दुकानात सर्वाधिक गर्दी

शुक्रवारी बाजारात सर्वत्रच गर्दी होती. परंतु कूलर, सलून व हार्डवेअरच्या दुकानात सर्वाधिक गर्दी दिसून आली. उन्हाळा सुरू झाला आहे. कडक ऊन पडू लागले आहे. अशाच २१ तारखेपर्यंत लॉकडाऊन असल्याने कूलर, दुरुस्ती,नवीन कुलर खरेदी करणे, त्याला ताट्या लावणे आदींसाठी गर्दी केली. तसेच सलून व हार्डवेअरच्या दुकानातही गर्दी होती.

बॉक्स

दारू दुकानावरील गर्दी अनियंत्रित

लॉकडाऊनची घोषणा होताच सर्वात प्रथम दारूच्या दुकानांसमोर गर्दी वाढली. २१ मार्चपर्यंत दारूची दुकाने बंद राहणार आहेत. तसेच शनिवार व रविवारीही दारूची दुकाने बंद राहतील. त्यामुळे शुक्रवारी दारूच्या दकानावर अनियंत्रित गर्दी झाली. शहरातील बहुतांश भागातील दारू दुकानासमोर गर्दी होती. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांनी कडक भूमिकाही घ्यावी लागली.

----------

शनिवार -रविवारी बंद कायम

नेहमीप्रमाणे उद्या शनिवार व रविवारीही बंद राहील. परंतु ती अंशत: राहील. यात सक्ती राहणार नाही.

उद्या शनिवार व रविवारी खालील गोष्टी सुरू राहतील व बंद राहतील.

हे राहतील सुरू

- वैद्यकीय सेवा

- वर्तमानपत्र व मीडिया

- दूध विक्री व पुरवठा

- भाजीपाला

-फळाचे दुकान

-पेट्रोल पंप, गॅस एजन्सी

- सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था

- बांधकाम

- उद्योग व कारखाने

- किराना दुकान

- चिकन, मटण व अंडे

- वाहन दुरुस्ती, वर्कशॉप

- पशुखाद्य दुकान

- बँक, पोस्ट सेवा (नियमानुसार)

हे राहील बंद

- दुकान, बाजार

- मॉल्स, सिनेमागृह, नाट्यगृह

- हॉटेल, रेस्टाॅरंट (ऑनलाईन डिलिव्हरीसाठी किचन रात्री ११ वाजेपर्यंत उघडे राहील.)

- सर्व शासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवा वगळून)

- सर्व खासगी कार्यालये