शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

नागपुरात शनिवार व रविवार बाजारपेठा बंद; ऑनलाईन खाद्यपदार्थ पुरवठा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 1:55 PM

Nagpur News कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या आदेशानुसार पुढील आदेशपर्यंत प्रत्येक शनिवारी, रविवारी बाजारपेठा व दुकाने बंद राहणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:  कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. वारंवार आवाहन केल्यानंतरही शहरातील नागरिक कोविड नियमांचे पालन करीत नाहीत. संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने अनेक निर्बंध लागू केले. ७ मार्चपर्यंत शहरातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, मंगल कार्यालय, लॉन आदी बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार दर शनिवार व रविवारी बंद राहतील. बाजारपेठा, दुकाने, हॉटेल, रस्टारेंट, खाद्यगृह बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. तर बुधवारी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पुन्हा सुधारित आदेश जारी केले आहे. त्यानुसार ग्रंथालय, अध्ययन कक्ष व जलतरण तलाव ७ मार्च पर्यंत बंद राहणार आहेत.

मागील काही दिवसात शहरातील कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. कोविड नियमांचे उल्लघन करणारे मंगल कार्यालय, लॉन, सभागृह, रेस्टारेंट, हॉटेल यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मास्क शिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. बाजारातील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी दिशा-निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानंतरही नियम मोडले तर साथरोग नियंत्रण अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत पोलीस कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर

सध्या एनडीएस पथकामार्फत मास्क न लावणे, मंगल कार्यालय, लॉन, सभागृह आदींवर कारवाई केली जात आहे. आठवडी बाजार तसेच सीताबर्डी, इतवारी, महाल, गांधीबाग, जरीपटका, खामला, धरमपेठ, गोगुळपेठ आदी बाजार भागातील गर्दीवर नजर ठेवली जात आहे. तीनवेळा नियमांचे उल्लंघन करणाºयांना जास्तीतजास्त ५० हजार रुपये दंड लावला जाणार आहे. संक्रमितांचा शोध घेऊन परिसर सील करण्याची कारवाई केली जात आहे. मनपा प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस