शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

मार्डचा 'ओपीडी बहिष्कार', रुग्णसेवा प्रभावित ; मेयो, मेडिकलमधील रुग्णांवर उपचारासाठी आली प्रतिक्षेची वेळ

By सुमेध वाघमार | Updated: November 3, 2025 16:55 IST

Nagpur : निवासी डॉक्टरांनी डॉ. मुंडे यांच्या घटनेनंतर निषेध व्यक्त करण्यासाठी काळी फीत बांधणे, काळे मास्क घालणे आणि कँडल मार्च काढणे यांसारखे शांततापूर्ण मार्ग निवासी डॉक्टरांनी अवलंबले होते.

नागपूर: वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी निवासी डॉक्टरांची संघटना 'मार्ड' आक्रमक झाली आहे. आज, सोमवारपासून मार्डने आपले आंदोलन अधिक तीव्र करत राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) पूर्णपणे बंद ठेवली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी रुग्णांची मोठी गर्दी असलेल्या मेयो आणि मेडिकल ) येथील ओपीडीवर बहिष्कार टाकल्याने रुग्णसेवा लक्षणीयरीत्या प्रभावित झाली.

निवासी डॉक्टरांनी डॉ. मुंडे यांच्या घटनेनंतर निषेध व्यक्त करण्यासाठी काळी फीत बांधणे, काळे मास्क घालणे आणि कँडल मार्च काढणे यांसारखे शांततापूर्ण मार्ग निवासी डॉक्टरांनी अवलंबले होते. मात्र, सरकारने त्यांच्या न्यायपूर्ण मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे सेंट्रल मार्डने अखेर कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. आज नागपूरच्या मेयो आणि मेडिकलमध्ये निवासी डॉक्टर ओपीडीमध्ये न जाता रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन करत होते. निवासी डॉक्टर्स हे शासकीय रुग्णालयाचा 'कणा' मानले जातात. त्यांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णांची हिस्ट्री घेणे, तपासणी करणे आणि औषधी लिहून देण्याचे मोठे काम वरिष्ठ डॉक्टरांवर आले. यामुळे ओपीडीमधील प्रत्येक विभागात कक्षासमोर रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि उपचारासाठी रुग्णांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली.  सुदैवाने, कॅज्युअल्टी आणि आपत्कालीन सेवांमध्ये निवासी डॉक्टर कार्यरत असल्याने तातडीच्या आणि गंभीर रुग्णांची सेवा मात्र बाधित झाली नाही. या आंदोलनात सेंट्रल मार्डचे महासचिव डॉ सुयश धावणे, मेडिकल मार्डचे अध्यक्ष डॉ. धीरज साळुंके , महासचिव डॉ. अमोल धनफुळे, उपाध्यक्ष डॉ. स्वाती पाटले, जनरल सेक्रटरी डॉ. अंकित यादव, कोषाध्यक्ष डॉ. भूषण पाटील यांच्यासह सर्व निवासी डॉक्टरांचा सक्रीय सहभाग होता. 

न्याय आणि सुरक्षिततेसाठी लढा 

सेंट्रल मार्डचे महासचिव डॉ. सुयश धावणे यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले, आम्ही रुग्णसेवेसाठी बांधील आहोत, पण आमच्या न्याय आणि सुरक्षिततेसाठी आवाज उठवणे हीसुद्धा आमची जबाबदारी आहे. ओपीडी सेवा बंद ठेवून आम्ही सरकारचे लक्ष आमच्या योग्य मागण्यांकडे वेधत आहोत.जर रुग्णसेवा कुठेही बाधित झाली, तर त्याची पूर्ण जबाबदारी आमच्या समस्या आणि मागण्या न ऐकणाºया सरकारवरच राहील.

English
हिंदी सारांश
Web Title : MARD's OPD Boycott Disrupts Patient Care; Long Wait Times at Hospitals

Web Summary : Resident doctors in Maharashtra boycotted OPD services demanding justice in Dr. Munde's death case. This caused long queues and waiting times for patients at hospitals like Mayo and Medical in Nagpur. Emergency services remained functional. Doctors emphasize their commitment to patient care alongside seeking justice.
टॅग्स :nagpurनागपूरMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटल