शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळी भांडणं मिटवतो, पण आधी शपथ घ्या की...; 'मनसे' युतीसाठी उद्धव ठाकरेंनी बंधूंसमोर ठेवली एक अट!
2
ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!
3
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
4
Anaya Bangar Boy to Girl Transition Story: संजय बांगरचा मुलगा का बनली मुलगी? 'ट्रान्सजेंडर' Anaya Bangar ने सगळंच सांगून टाकलं...
5
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 'या' दिवशी ६ तासांसाठी बंद राहणार!
6
FD vs SIP: कोणता पर्याय ठरू शकतो बेस्ट, फायदा-तोट्याचं गणित समजून घ्या
7
“मराठीला हिंदी नाही तर गुजरातीपासून सर्वाधिक धोका”; संजय राऊतांची मनसे, भाजपावर टीका
8
Tarot Card: सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा काळ, प्रयत्नात कुचराई नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
9
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
10
प्रेमाचा जांगडगुत्ता! मुलीच्या सासऱ्यासोबतच ममता झाली फरार; महिलेच्या पतीला दुःख अनावर
11
कोट्याधीश करणारा वसुमती योग: ८ राशींना शुभ, उत्पन्न वाढेल; हाती पैसा राहील, लाभच लाभ होतील!
12
५ वर्षांपूर्वी मृत्यू झालेला 'तो' रिक्षा चालवताना सापडला; पत्नीशी WhatsApp वर चॅटिंग, अखेर...
13
एका शेअरवर ₹११७ चा डिविडेंड देतेय कंपनी, रेकॉर्ड डेट आता जास्त दूर नाही; पाहा कोणता आहे शेअर?
14
Mumbai: बीएमसीने 'अभय' देऊनही मुंबईकरांनी केलं दुर्लक्ष, आता भरा दोन टक्के दंड 
15
चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!
16
मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
17
मुंबई: स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी पत्नीला पाठवला व्हिडीओ, म्हणाला, 'जगण्याची इच्छा नाही'
18
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
19
आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार
20
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली

मराठी माणसाकडे स्कील आहे, पण आत्मविश्वासाची कमतरता : श्रीनिवास ठाणेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 22:18 IST

मराठी माणसाकडे स्कील आहे, पण आत्मविश्वासाची कमतरता आहे. जीवनात प्रत्येकालाच अपयश येते, पण हार मानू नका, त्यातून मार्ग काढा. इच्छाशक्तीच्या जोरावर जगात काहीही साध्य करता येते, असे अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक आणि नागपुरात आयोजित १६ वे जागतिक मराठी संमेलन ‘शोध मराठी मनाचा’चे संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांनी येथे स्पष्ट केले. प्रेस क्लब येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते.

ठळक मुद्देइच्छाशक्तीच्या जोरावर काहीही साध्य करता येते

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठी माणसाकडे स्कील आहे, पण आत्मविश्वासाची कमतरता आहे. जीवनात प्रत्येकालाच अपयश येते, पण हार मानू नका, त्यातून मार्ग काढा. इच्छाशक्तीच्या जोरावर जगात काहीही साध्य करता येते, असे अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक आणि नागपुरात आयोजित १६ वे जागतिक मराठी संमेलन ‘शोध मराठी मनाचा’चे संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांनी येथे स्पष्ट केले. प्रेस क्लब येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते.डॉ. ठाणेदार हे अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक आहेत. अमेरिकेतील मिशिगन राज्याच्या गव्हर्नरची निवडणूकही ते लढले आहेत. त्यांनी आपली आत्मकथा ‘ही श्री ची इच्छा’ लिहिली आहे. त्याची ५० वी आवृत्ती निघत आहे. ई वेबसाईटवर ती पाच लाख लोकांनी बघितली आहे, हे विशेष.डॉ. ठाणेदार म्हणाले, मी एक मराठी माणूस. वडील कारकून होते. असे असताना मी अमेरिकेत एक यशस्वी उद्योजक आहे. ५०० लोकांना मी रोजगार देतो. मी खूप मोठे काम केले असे नाही. परंतु जीवनात जे काही मिळविले ते केवळ स्वत:च्या इच्छाशक्तीच्या जोरावर मिळवले आहे. त्यामुळेच मी माझी आत्मकथा ‘ही श्री ची इच्छा’ लिहिली आहे. हा सर्व व्यवसाय सुखात सुरू होता. सर्व काही सेटल होते. अशावेळी अमेरिकेत जागतिक मंदी आली आणि क्षणात २०० मिलियन डॉलरचा उभा केलेला व्यवसाय बुडाला. परंतु मी हार मानली नाही. वयाच्या ५५ व्या वर्षी पुन्हा कामाला लागलो आणि पुन्हा व्यवसाय उभा केला. या अनुभवावर आधारित मी ‘पुन्हा श्री गणेशा’ हे दुसरे पुस्तक लिहिले. या दोन्ही पुस्तकांमध्ये माझ्या कर्तबगारीपेक्षा मला आलेल्या अपयशाचीच जास्त चर्चा आहे. त्यामुळे अपयश आले की खचू नका. हार मानू नका, त्याचा सामना करा, मार्ग नक्कीच निघेल. हा माझा अनुभव असून विद्यार्थ्यांशी सुद्धा मी हाच संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी जागतिक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष गिरीश गांधी, प्रदीप मैत्र प्रामुख्याने उपस्थित होते.भारताची गेल्या २० वर्षात खूप प्रगती१९८९ मध्ये मी भारत सोडला, तेव्हा भारतात फारशा संधी उपलब्ध नव्हत्या. परंतु आता तशी परिस्थिती नाही. गेल्या २० वर्षात भारताने खूप प्रगती केली आहे. आता चांगल्या संधी आहेत. जगातील इतर हुकूमशाही देश पाहिल्यावर आपल्या भारताची लोकशाही जगात सर्वात मोठी असल्याचा अनुभव येतो. मराठी माणसात स्कीलची कमतरता नाही थोडा आत्मविश्वास कमी असल्याचेही डॉ. ठाणेदार यांनी यावेळी सांगितले. दोन पुस्तके लिहिली असून अमेरिकेतील निवडणुकीच्या अनुभवावरही एक पुस्तक लिहित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनnagpurनागपूर