शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाला आरक्षण मिळणारच, ओबीसी आरक्षणाला धक्का नाही; भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा

By योगेश पांडे | Updated: September 14, 2023 17:38 IST

शरद पवारांना आरक्षणावर बोलण्याचा हक्क नाही - बावनकुळे

नागपूर : राज्यात मराठा आरक्षणावरूनराजकारण तापले असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आरक्षण मिळणारच असल्याचा दावा केला. ओबीसींच्या किंवा कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल, असा दावा बावनकुळे यांनी केला. गुरुवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावले उचलली आहेत. जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे जी परिस्थिती निर्माण झाली होती ती सुटणे आवश्यक होते. मुख्यमंत्री त्यांचे उपोषण सोडण्यासाठी गेले, ते सरकारचे सर्वोच्च नेते आहेत, त्यामुळे कोण गेले किवा नाही याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्वपक्षीय बैठकीत जी भूमिका महायुती सरकारने मान्य केली होती. त्यानुसारच आरक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने भिती व संभ्रम बाळगू नये , असे ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदा करून न्याय देण्याचा प्रयत्न केला. ४० वर्षे सत्तेत राहून शरद पवारांना आरक्षण देणे जमले नाही. त्यामुळे त्यांना या विषयावर बोलण्याचा हक्कच नाही. त्यांनाच या मुद्द्यावर प्रश्न विचारायला हवे, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा