शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

माओवादी साईबाबाचा जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 8:59 PM

आजन्म कारावासाची शिक्षा झालेला माओवादी जी. एन. साईबाबा याचा शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी फेटाळून लावला. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदुरकर व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्दे हायकोर्टाचा दणका : कोरोनाचे कारण दिले होते

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आजन्म कारावासाची शिक्षा झालेला माओवादी जी. एन. साईबाबा याचा शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी फेटाळून लावला. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदुरकर व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये कोरोना संक्रमण वाढले आहे. अनेक कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कारागृह प्रशासन कैद्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेत नाही. त्यामुळे शिक्षा स्थगित करून जामीन देण्यात यावा असे साईबाबाचे म्हणणे होते. राज्य सरकारने साईबाबाचे आरोप फेटाळून लावले. साईबाबाला अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्या ठिकाणी एकही कोरोना रुग्ण नाही. साईबाबाच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली जात आहे. त्याने यापूर्वीदेखील आरोग्याच्या कारणावरून जामीन मागितला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता त्याला जामीन नाकारण्यात आला होता, असे सरकारने सांगितले. त्यानंतर उच्च न्यायालयाने यासह विविध बाबी लक्षात घेता वरीलप्रमाणे निर्णय दिला. ७ मार्च २०१७ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने साईबाबाला बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायद्यांतर्गत आजन्म कारावासाची कमाल शिक्षा सुनावली आहे. तो सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे. साईबाबातर्फे अ‍ॅड. निहालसिंग राठोड तर, सरकारतर्फे अ‍ॅड. प्रशांत सत्यनाथन यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :District Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालयnaxaliteनक्षलवादी