शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

नागपुरात जोराच्या पावसामुळे अनेक वस्त्या जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 01:20 IST

शहरात मंगळवारी रात्री झालेल्या जोराच्या पावसामुळे खोलगट भागातील वस्त्या जलमय झाल्या. नागरिकांच्या घरात तर कुठे अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये पाणी साचले. दोन तासात एकाच वेळी प्राप्त झालेल्या तक्रारींमुळे अग्निशमन विभागाचीही चागलीच धावपळ झाली. काही नगरसेवकांनीही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या तक्रारी केल्या.

ठळक मुद्देअग्निशमन विभागाची रात्रभर धावपळ : ठिकठिकाणी पाणी साचले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात मंगळवारी रात्री झालेल्या जोराच्या पावसामुळे खोलगट भागातील वस्त्या जलमय झाल्या. नागरिकांच्या घरात तर कुठे अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये पाणी साचले. दोन तासात एकाच वेळी प्राप्त झालेल्या तक्रारींमुळे अग्निशमन विभागाचीही चागलीच धावपळ झाली. काही नगरसेवकांनीही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या तक्रारी केल्या.जोराच्या पावसामुळे रस्ते, वस्त्या जलमय झाल्या. अनेक चौकात पाणी साचले. रात्री ड्युटीवरून घरी परतणाऱ्यांना त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. काही ठिकाणी चेंबर तुंबल्यामुळे रस्त्यावर पाणी वाहत होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर चौकात साचलेले पाणी, चेंबरच्या पाण्याचा आपोआप निचरा झाल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले. पाऊस मुसळधार बसरल्यानंतर रात्रीदेखील पावसाची रिपरिप सुरू होती. अशा परिस्थितीतही अग्निशमन विभागाचे कर्मचारी आपत्ती निवारणासाठी झटत होते.येथे शिरले पाणीसी.ए.सोड येथील हॉटेल अलझमझमच्या बाजूच्या घरात, मानेवाडा रोड महालक्ष्मी गल्ली नंबर ३, आ. प्रवीण दटके यांच्या घराजवळ पाणी साचले. गंजीपेठ पंचकमिटी हनुमानमंदिर येथील घरात पाणी साचले. धंतोली पोलिस ठाणे मागील घरात, दर्शन कॉलनी प्लॉट क्रमांक ६११/सी. किराणा स्टोअरजवळ, दयानंद पार्क मार्ग प्लॉट क्रमांक ९३ येथे, नरेंद्रनगर तुकाराम सभागृह घडीवाल ले-आऊट गल्ली क्रमांक ३, गणेश चौक येथील घरात, जरीपटका, रिंगरोड, भीमचौक, वैभव अपार्टमेंट परिसरात तसेच इंदिरानगर जाटतरोडी, इमामवाडी गल्ली नंबर ३ रेल्वे इलेक्ट्रिक पॉवर हाऊस येथील विहिरीत पिंपळाचे झाड कोसळून पडले.प्रमुख चौकातही साचले पाणीपावसाचा फटका शहरातील प्रमुख चौकांना आणि रस्त्यांनाही पडला. शहरातील मेडिकल चौकात पाणी साचले होते. तसेच, सरदार पटेल चौक, पद्मावती चौक, नंदनवन सिमेंट रोड, गंगाबाई घाटाजवळ, जगनाडे चौकात तसेच चंद्रशेखर आझाद चौकात पाणी साचले होते. दोन चेंबर तुडुंब भरून वाहत होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाण्याचा निचरा झाला.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर