शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

न्यायव्यवस्थेत अनेक दोष, नियंत्रणासाठी हवी स्वतंत्र संस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 22:49 IST

न्यायाधीशांच्या विरोधातील गंभीर तक्रारींच्या चौकशीसाठी व नियुक्तीसाठी ‘न्यायिक लोकपाल’ सारखी स्वतंत्र संस्था निर्माण करण्याची नितांत गरज असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. प्रशांत भूषण यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देप्रशांत भूषण यांचे मत : डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयातर्फे व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकशाहीत अतिशय महत्त्वपूर्ण असलेला न्यायव्यवस्थेचा स्तंभ आज ढासळण्याच्या मार्गावर आहे. हे क्षेत्रही भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर आरोप होत असताना त्यांच्या चौकशीसाठी योग्य व्यवस्था नाही. प्रतिष्ठेच्या नावावर न्यायव्यवस्थेतील अनियमिततेकडे दुर्लक्ष करून जबाबदारी झटकली जात आहे. दुसरीकडे न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्येही वशिलेबाजी व भ्रष्टाचार फोफावला आहे. त्यामुळे न्यायाधीशांच्या विरोधातील गंभीर तक्रारींच्या चौकशीसाठी व नियुक्तीसाठी ‘न्यायिक लोकपाल’सारखी स्वतंत्र संस्था निर्माण करण्याची नितांत गरज असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. प्रशांत भूषण यांनी व्यक्त केले.डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयाच्यावतीने ‘न्यायिक जबाबदारी व न्यायव्यवस्थेतील सुधारणा’ विषयावर अ‍ॅड. प्रशांत भूषण यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.सी. पवार, विधी विभागाचे प्रमुख एन.एम. खिराळे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, एन.आर. सुटे आदी मान्यवर उपस्थित होते. अ‍ॅड. प्रशांत भूषण यांनी न्यायव्यवस्थेतील अनियमिततेवर यावेळी तीव्र प्रहार केला. त्यांनी अकाऊंटीबिलिटी (जबाबदारी)च्या प्रश्नापासून सुरुवात केली. न्यायव्यवस्था इतर विभागातील अनियमिततेबाबत बोलते, मात्र त्यांच्या स्वत:च्या व्यवस्थेत असलेली अनियमितता झाकून ठेवली जाते. उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप व इतर अनेक स्वरुपाच्या गंभीर तक्रारी दाखल झाल्या. मात्र आजपर्यंत एकावरही कारवाई झाली नाही. कारवाईसाठी असलेल्या महाभियोगाच्या पद्धतीचा गैरवापरच केला जातो. असे प्रकरण संसदेत जाते व सरकारच्या प्रतिनिधींकडून त्याचा फायदा घेतला जातो. त्यानंतर सरकारच्याच अखत्यारीत असलेल्या सीबीआयसारख्या तपास यंत्रणांकडून थातूरमातूर चौकशी करून प्रकरण ‘रफादफा’ केले जाते. न्यायव्यवस्थेत तपासाची ‘इन हाऊस’ व्यवस्था आहे. मात्र ओळखीमुळे दोषी न्यायाधीशाचा तपास योग्य पद्धतीने होत नाही. कधी ओळख नसली तरी, व्यवस्थेची प्रतिष्ठा म्हणूनही अशा प्रकरणांवर पडदा टाकला जातो. माहिती अधिकार कायदाही न्यायपालिकेची जबाबदारी निश्चित करण्यात निष्प्रभ ठरला आहे. अशावेळी न्यायाधीशांविरोधातील तक्रारींच्या पारदर्शक चौकशीसाठी न्यायिक लोकपालसारखी स्वतंत्र संस्था निर्माण करणे आवश्यक आहे. निष्क्रिय न्यायव्यवस्था फायद्याची ठरत असल्याने सरकार त्यामध्ये सुधारणा करण्यास तयार नाही. दुसरीकडे सरकारकडून लाभ घेण्यासाठी न्यायाधीशांनाही सुधारणेत रस नाही. त्यामुळे न्यायव्यवस्था वाचविण्यासाठी देशातील तरुण व नागरिकांना याबाबत चर्चा घडवून आंदोलन उभे करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.संचालन व आभारप्रदर्शन डॉ. वर्षा देशपांडे यांनी केले.नियुक्तीसाठी असावी युपीएससीसारखी प्रक्रियाउच्च व सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेवरही त्यांनी यावेळी प्रहार केला. या नियुक्त्या नातलगांची वशिलेबाजी व भ्रष्टाचाराचे कुरण झाल्या आहेत. कॉलेजियम पद्धतीमध्ये निवड करणारे न्यायाधीश नातेवाईकांना व ओळखीच्यांना प्राधान्य देतात. सरकारही मग आपल्या लोकांना संधी देण्यासाठी दबाव निर्माण करतात. यामुळे न्यायव्यवस्थेची स्वतंत्रता नष्ट होते. दुसरीकडे कॉलेजियममधील न्यायाधीशांना निवड करण्यासाठी पुरेसा वेळही नसल्याने योग्य निवड होईलच असे नाही. त्यामुळे निवडीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी या कामासाठी पूर्ण वेळ देणारी स्वतंत्र व्यवस्था असणे आवश्यक आहे. याशिवाय युपीएससीप्रमाणे कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी यंत्रणा तयार करावी असे मतही अ‍ॅड. भूषण यांनी व्यक्त केले.ग्रामन्यायालयाचे काय झाले?देशात उच्च व सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची प्रचंड कमतरता आहे. दोन्हीकडे ५० टक्के पदे रिक्त आहेत. ही बाब गंभीरतेने घेतली जात नाही. न्यायपालिकेत सुधारणा म्हणून ग्रामन्यायालय कायदा करण्याचा प्रस्ताव आला. यामध्ये काही गावे मिळून ब्लॉक स्तरावर न्यायालयाची निर्मिती करून लहानसहान खटले निपटवण्याचा विचार होता. मात्र याची हवी तशी अंमलबजावणी झाली नाही. सरकार आणि न्यायपालिकाही सुधारणेबाबत गंभीर नसल्याची टीका त्यांनी केली.

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Law Collegeडॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी