शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
4
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
5
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
6
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
7
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
8
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
9
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
10
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
11
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
12
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
13
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
14
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
15
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
16
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
17
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
18
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
19
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
20
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले

तोतया पोलिसांची बनवेगिरी

By admin | Updated: May 17, 2014 02:02 IST

पोलीस असल्याची बतावणी करून दोन भामट्यांनी आज एका तासात एका वृध्दांसह दोघांना लुटले. धंतोली आणि अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

नागपूर : पोलीस असल्याची बतावणी करून दोन भामट्यांनी आज एका तासात एका वृध्दांसह दोघांना लुटले. धंतोली आणि अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.सुरेंद्रनगर येथील रहिवासी वसंत रघुनाथ रायपूरकर (वय ८१) हे मॉर्निंंग वॉक करीत होते. सकाळी ७.३0 वाजता आरपीटीएस रोडवर अंदाजे ४0 ते ४५ वयोगटातील दोन भामटे त्याच्याजवळ आले. आम्ही पोलीस आहोत. या ठिकाणी सोन्याचे दागिने लुटण्याच्या पुष्कळ घटना घडल्या. ‘ तुम्ही तुमची सोन्याची अंगठी काढून खिशात ठेवा‘अशी त्याने बतावणी केली. लगेच रायपूरकर यांच्या हातातील अंगठी काढून ती पुडीत बांधल्याचा बनाव केला आणि निघून गेले. काही वेळेनंतर रायपूरकर यांनी पुडीत अंगठी पाहिली असता ती दिसली नाही. या घटनेच्या एक तासानंतर अजनीतील रामेश्‍वरी मार्गावर अशीच एक घटना घडली. अनुराधा क्रिष्णमुर्ती अय्यर (वय ५५, रा. बॅनर्जी ले आउट, सत्यनारायण अपार्टमेंट) या ‘मॉर्निंग वॉक करीत असताना रामेश्‍वरी नूर हार्डवेअरजवळ त्यांना दोन भामट्यांनी रोखले. आम्ही पोलीस आहोत, समोर लुटमारीची् घटना झाली आहे, असे सांगून त्यांनी अय्यर यांना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोनसाखळी काढायला लावली. हे दागिने कागदाच्या पुडीत बांधल्याचा देखावा करून ती पुडी अय्यर यांच्या हातात दिली आणि पळून गेले. काही वेळेनंतर अय्यर यांनी पुडी सोडून पाहिली असता त्यात दागिने नव्हते. त्या भामट्यांनी पळविलेल्या दागिन्यांची किंमत १ लाख २0 हजार आहे.धंतोली आणि अजनी पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. आरोपींचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)