घरातच ई-कचरा, प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचा मंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:09 AM2021-04-16T04:09:16+5:302021-04-16T04:09:16+5:30

नागपूर : काेराेनाच्या महाप्रकाेपामुळे नागरिकांवर घरीच राहण्याची वेळ आली आहे. हा काळ कंटाळवाणा असला तरी आपल्या सुरक्षेसाठी ताे आवश्यक ...

The mantra of e-waste, plastic waste management at home | घरातच ई-कचरा, प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचा मंत्र

घरातच ई-कचरा, प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचा मंत्र

Next

नागपूर : काेराेनाच्या महाप्रकाेपामुळे नागरिकांवर घरीच राहण्याची वेळ आली आहे. हा काळ कंटाळवाणा असला तरी आपल्या सुरक्षेसाठी ताे आवश्यक आहे. मात्र या रिकाम्या वेळेचा ई-कचरा आणि प्लास्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी सदुपयाेगही करता येऊ शकताे. ही केवळ सूचना नाही तर अनेक साेसायटीतील नागरिकांनी हे शक्य करून दाखविले आहे. विशेष म्हणजे साेशल मीडियावर सुरू असलेल्या या कॅम्पेनशी अनेक कुटुंब सातत्याने जुळायला लागले आहेत.

‘अन्विती’ या सक्रिय पर्यावरण ग्रुपच्या सदस्यांनी व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून हे अभियान चालविले आहे. ग्रुपच्या सदस्य शेफाली दुधबळे या स्वत: पर्यावरण संवर्धनाचे कार्य करीत आहेत. यापूर्वीही त्यांनी घरातील सर्वप्रकारच्या कचऱ्याचे व्यवस्थापन व ओल्या कचऱ्याच्या उपयाेगाबाबत जागृती अभियान राबविले हाेते. गेल्या वर्षी लाॅकडाऊनच्या काळात त्यांनी ई-कचरा व्यवस्थापनाला प्राधान्य देत घरीच त्याचे विलगीकरणाचे उपाय सांगितले आहेत. त्याद्वारे अनेक साेसायटीमधील कुटुंबीयांना त्यांनी जाेडले हाेते. त्यानंतर हा कचरा अधिकृत एजन्सीकडे जमा करण्यात आला. दुधबळे यांनी सांगितले, कचऱ्याचे विलगीकरण हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. एक तर प्लास्टिकच्या तुलनेत हा कचरा कमी प्रमाणात निर्माण होतो व हा बहुतेक स्वच्छ स्वरूपातच असतो. एरियामध्ये १० साेसायटींची निवड करून महिन्याच्या शेवटपर्यंत ई-कचरा गाेळा करायला सांगितला. त्यानंतर वेगवेगळ्या वेळा देऊन ताे ग्रुपच्या एका व्यक्तीकडे जमा करायला सांगितला. हे अभियान साेशल मीडियावर ओळखीच्या व्यक्तीकडे पाठविले. याद्वारे अनेक लाेक अभियानाशी जुळत गेले. आता ३० च्यावर साेसायटीमधील ८० च्या जवळपास कुटुंब अभियानाशी जुळल्याचे शेफाली यांनी सांगितले.

परिस्थिती सामान्य झाल्यानंतर व लाॅकडाऊन खुलल्यानंतर सर्वांकडून हा कचरा गाेळा करून ई-वेस्ट रिसायकलिंग एजन्सीच्या प्रतिनिधीला बाेलावून त्यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे शहरातील इतर साेसायट्यांना जाेडून दाेन-तीन महिन्याच्या कालावधीत सातत्याने ही प्रक्रिया राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कचऱ्याचे निश्चित दर ठरवून संबंधित साेसायटीच्या फंडामध्ये समावेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ई-कचरा किंवा प्लास्टिक कचरा विलगीकरणाबाबत नागरिकांना जागृत करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शहरातील प्रत्येक हाऊसिंग साेसायटीला झिराे वेस्ट साेसायटीकडे वळविण्यासाठीच आणि त्यांना तसे प्रमाणपत्र देण्यात येईल.

- शेफाली दुधबळे, पर्यावरण कार्यकर्त्या

Web Title: The mantra of e-waste, plastic waste management at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.