शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

अर्थसंकल्पावर मनपाच्या स्थायी समितीचे मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:54 PM

महापालिकेच्या नवीन स्थायी समितीची निवड होताच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. नवनियुक्त अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांना समितीची बैठक घेण्याची संधी मिळाली नाही. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर १० ते १५ दिवसांनी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात स्थायी समितीचा वर्ष २०१९-२० या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करण्याचा पोहाणे यांचा प्रयत्न आहे. याचा विचार करता विभागनिहाय उत्पन्न, प्रस्तावित योजना, सुरू असलेली विकास कामे आदींचा आढावा घेण्याला मंगळवारी सुरुवात झाली.

ठळक मुद्देझोनस्तरावरील माहिती अपूर्ण; गुरुवारी पुन्हा चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या नवीन स्थायी समितीची निवड होताच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. नवनियुक्त अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांना समितीची बैठक घेण्याची संधी मिळाली नाही. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर १० ते १५ दिवसांनी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात स्थायी समितीचा वर्ष २०१९-२० या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करण्याचा पोहाणे यांचा प्रयत्न आहे. याचा विचार करता विभागनिहाय उत्पन्न, प्रस्तावित योजना, सुरू असलेली विकास कामे आदींचा आढावा घेण्याला मंगळवारी सुरुवात झाली.पहिल्या दिवशी झोनस्तरावरील सहायक आयुक्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडे विस्तृत माहिती उपलब्ध नसल्याने, गुरुवारी २५ एप्रिलला पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी उद्यान विभागासह छोट्या छोट्या विभागांची माहिती घेण्यात आली. पोहाणे यांनी याला दुजोरा दिला. झोनस्तरावरील आढावा घेतला जाणार होता. परंतु सहायक आयुक्त व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने, त्यांना माहिती संकलित करता आलेली नाही. त्यामुळे गुरुवारी महापालिका मुख्यालयात माहितीसह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. अर्थसंकल्प जून महिन्यात सादर केला तर विकास कामे लवकर सुरू होतील, यादृष्टीने प्रयत्न असल्याची माहिती पोहाणे यांनी दिली.स्थायी समितीचे माजी अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी २०१८-१९ या वर्षाचा २,९४६ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. प्रयत्न करूनही गेल्या आर्थिक वर्षात २०१७.७५ कोटींचा महसूल जमा झाला. अपेक्षित महसूल तिजोरीत जमा न झाल्याने अनेक विकास कामे रखडली. विद्यमान अध्यक्षांचाही जम्बो अर्थसंकल्प सादर करण्याचा विचार आहे. त्यानुसार तीन हजार कोटीहून अधिक रकमेचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र उत्पन्नाचे स्रोत विचारात घेता, महापालिका प्रशासनाला दिलेले उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार नाही.पुन्हा अनुदानाचा वाटामहापालिकेच्या तिजोरीत जमा होणाऱ्या महसुलात प्रत्यक्ष उत्पन्न २५ ते ३० टक्के आहे. उर्वरित ७० टक्के रक्कम राज्य सरकारकडून मिळणारे विशेष अनुदान, जीएसटी अनुदान यातून जमा होते. पुढील अर्थसंकल्पातही अशीच परिस्थिती राहणार आहे. दर महिन्याला ८६ कोटींचे जीएसटी अनुदान मिळत आहे. वर्षाला १०३२ कोटी यातून मिळणार आहेत. मालमत्ता करातून २५० ते २७५ कोटी येण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षात मालमत्ता करातून २२८ कोटींचा महसूल आला. याचा विचार करता पुढील वर्षात उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे लागतील.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प