शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर हल्ला; 1 जवान शहीद, 3 पोलीस कर्मचारी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 15:32 IST

सध्या परिसरात शोध मोहिम सुरू आहे.

Manipur Violence : मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात CRPF आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त पथकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. घात लावून बसलेल्या अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी आज(14 जुलै) सकाळी 9.40 च्या सुमारास अचानक केलेल्या या हल्ल्यात CRPF चा एक जवान शहीद झाला आहे, तर तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, 13 जुलै रोजी जिरीबाम जिल्ह्यातील मोनबुंग गावाजवळ गोळीबार झाला होता. त्यामुळे सीआरपीएफ आणि जिरीबाम जिल्हा पोलिसांचे पथक या परिसरात सर्च ऑपरेशन राबवत होते. या दरम्यान, घात लावून बसलेल्या हल्लेखोरांनी या पथकावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे तीन जवान जखमी झाले, तर गोळी लागल्याने एका सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाला. अजय कुमार झा (४३) असे शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानाचे नाव असून, ते बिहारचा रहिवासी आहे.

एप्रिलमध्ये दोन समुदायांमध्ये हिंसाचार मणिपूरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून हिंसाचार पसरलेला आहे. कुकी आणि मेईतेई समुदायांमधील संघर्षाने संपूर्ण राज्य पेटून निघाले आहे. गेल्या वर्षी 3 मे रोजी मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार सुरू झाल्यापासून 180 हून अधिक लोक मारले गेले आहेत. मणिपूरच्या लोकसंख्येच्या सुमारे 53 टक्के मेईतेई असून, ते इम्फाळ खोऱ्यात राहतात. तसेच, नागा आणि कुकी आदिवासींची संख्या 40 टक्के असून, ते डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारFiringगोळीबार