नागपूर : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने आंबा, मिलेट व धान्य महोत्सव २०२५ चे आयोजन शुक्रवारी २ मे ते ५ मे २०२५ दरम्यान कुसूमताई वानखेडे भवन, नागपूर येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात कोकणातील हापूस, पायरी, दशहरी तसेच गडचिरोलीसारख्या भागातील स्थानिक आंब्यांची थेट विक्री होणार आहे.
विदर्भ व महाराष्ट्रातील विविध भागांतील मिलेट व धान्य उत्पादक आपल्या शेतमालाची कोणत्याही मध्यस्थाविना थेट ग्राहकांना विक्री करणार आहेत. महोत्सवामध्ये सर्व प्रकारचे मिलेट्स जसे, ज्वारी, नाचणी, बाजरी, वरई, सावा, भगर, कुटकी. राळा उपलब्ध राहील. या मिलेट्सचे प्रक्रियायुक्त पदार्थ जसे नाचणी बिस्कीट, नाचणी पापड, ज्वारीच्या लाह्या, रोस्टेड ज्वारी, बाजरा, इडली मिक्स, कुटकिचे लाडु असे अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणात नागपूरकरांना उपलब्ध होणार आहे. , सुमारे ५० ते ५५ स्टॉल्स उपलब्ध असतील. ग्राहकांना अस्सल हापूस आंब्याची ओळख व खात्री यामुळे मिळणार आहे. शुकव्रारी सकाळी १० वाजता महोत्सवाला सुरुवात होईल. इतर दिवशी महोत्सवाची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ असे राहील. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य कृषि पणन मंडळाच्या विभागिय कार्यालयाचे उपसरव्यवस्थापक अजय कडू यांनी केले आहे.