काटाेल : एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान अज्ञात चाेरट्याने महिलेल्या पर्समधील राेख रक्कम व साेन्याचे मंगळसूत्र असा ६१ हजार ३०० रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेला. ही घटना काटाेल ते रेल्वे उड्डाणपूल दरम्यान साेमवारी दुपारच्या सुमारास घडली.
प्रिया धर्मेंद्र मुळे (२६, रा. नरसाळा राेड, गॅस गाेडावूनजवळ, काटाेल) या काटाेल बसने नागपूर येथे जाण्याकरिता एसटी बसमध्ये बसल्या. रेल्वे उड्डाणपूल परिसरात कंडक्टर तिकीट देण्यासाठी आला असता, त्यांनी पैसे देण्यासाठी पर्स बघितले असता, पर्सची चेन उघडी दिसली. तपासणी केली असता, पर्समधील राेख १३०० रुपये व अडीच ताेळ्याचे साेन्याचे मंगळसूत्र किमत ६० हजार रुपये असा एकूण ६१ हजार ३०० रुपयांचा ऐवज चाेरट्याने चाेरून नेला. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. पुढील तपास पाेलीस हवालदार प्रभुदास दलाल करीत आहेत.