यशवंत मनोहर यांना मंचरकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 11:38 AM2020-02-13T11:38:03+5:302020-02-13T11:38:42+5:30

प्रा. डॉ. र.बा. मंचरकर स्मृती प्रतिष्ठान, अहमदनगरच्या वतीने देण्यात येणारा ‘प्रा. डॉ. र.बा. मंचरकर स्मृती समीक्षा जीवनगौरव पुरस्कार’ प्रसिद्ध कवी, साहित्यिक, समीक्षक प्रा. डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे.

Mancharkar Smriti Jeevan Gaurav Award for Yashwant Manohar | यशवंत मनोहर यांना मंचरकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार

यशवंत मनोहर यांना मंचरकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रा. डॉ. र.बा. मंचरकर स्मृती प्रतिष्ठान, अहमदनगरच्या वतीने देण्यात येणारा ‘प्रा. डॉ. र.बा. मंचरकर स्मृती समीक्षा जीवनगौरव पुरस्कार’ प्रसिद्ध कवी, साहित्यिक, समीक्षक प्रा. डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे. अकरा हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून येत्या १६ फेब्रुवारी रोजी राधाबाई काळे महाविद्यालयात होणाऱ्या सोहळ््यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अविनाश सांगोलकर व सचिव डॉ. अभिजित मंचरकर यांनी दिली.
प्रतिष्ठानच्या या पुरस्काराचे यंदा आठवे वर्ष असून त्यासाठी डॉ. मनोहर यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. यशवंत मनोहर हे नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख आहेत. त्यांचे अकरा काव्यसंग्रह, तीन कादंबºया, एक प्रवास वर्णन, बावीस वैचारिक निबंध लेख संग्रह आणि तेवीस समीक्षाग्रंथ प्रकाशित झाले असून वर्तमानपत्रांमधूनही त्यांनी विपुल लेखन केले आहे. अनेक पुरस्कारप्राप्त डॉ. मनोहर यांची आंबेडकरी विचारवंत म्हणूनही ओळख आहे. येत्या १६ रोजी नगर येथे होणारा पुरस्कार वितरण सोहळा ज्येष्ठ समीक्षक, साहित्यिक विलास राशिनकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब ओटी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

Web Title: Mancharkar Smriti Jeevan Gaurav Award for Yashwant Manohar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.