: सोमवारी स्थायी समितीपुढे प्रस्ताव मांडणार
नागपूर : महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे स्थायी समितीची मंजुरी न घेताच ३० नोव्हेंबर २०११ पासून वाढीव दराने शुल्क वसुली केली जाते. आता अडीच वर्षानंतर हा प्रस्ताव समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. मंजुरी न घेताच अग्निशमन विभागाकडून वाढीव दराने शुल्क वसूलण्यावर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे १२ मे रोजी सोमवारी होणार्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. आग नियंत्रण व जीव संरक्षण उपाययोजना अधिनियम २००६ च्या कलम १६(१)नुसार अग्निशमन सेवा शुल्क आकारले जाते. २५ लाखांहून अधिक व ५० लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरात मनपा अशा स्वरूपाचे शुल्क वसूल करू शकते. तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आचारसंहितेच्या कालावधीत सेवा शुल्कात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. निवासी भागात इमारत बांधकाम करताना १५ खोल्या, १५ ते ३० वा त्याहून अधिक खोल्यांच्या बांधकामासाठी वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहे. बहुमजली इमारतीसाठी १५ ते २४ मीटर, २४ ते ३५ व ३५ ते ४५ मीटर वा त्याहून अधिक उंचीच्या इमारतींसाठी दर निश्चित करण्यात आले आाहे. तारांकित व गैरतारांकित हॉटेल्ससाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाते. तसेच विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र शुल्क वसूल केले जाते. शुल्क वाढीचा प्र्रस्ताव इमारतीचे नुतनीकरण, अग्निशमन यंत्रणा असल्याबाबतचे प्र्रमाणपत्र यासाठी आकारण्यात येणार्या शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. नुतनीकरण शुल्क १००० वरून २००० अग्निशमन यंत्रणा असल्याबाबतच्या प्रमाणपत्रासाठी २००० वरून २५०० तर विहीर सफाईसाठी ४०० ऐवजी ५०० रुपये (सहा तासांसाठी )तसेच मुद्र्रांक शुल्क वाढीचा प्रस्ताव आहे. (प्रतिनिधी)