शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

‘मन की बात’ थेट ‘दिल से’ : आज ‘प्रपोज डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:45 IST

केवळ ‘तू मला आवडतेस’ हे सांगण्यासाठी प्रियकर ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर...’च्या ‘स्टाईल’मध्ये ‘लव्ह लेटर’ लिहावे व ते प्रेयसीला कुणाच्या तरी माध्यमातून द्यावे, हे चलन काळासोबत मागे पडताना दिसत आहे. आता तर ‘हायटेक’ जमान्यात थेट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘प्रपोज’ करण्यावर तरुणाईचा भर दिसून येत आहे. तऱ्हा कुठलीही असो मात्र सर्वांची प्रेमाची भावना सारखीच असते, अगदी त्या ओळींसारखी ‘प्रेम हे प्रेम असते तुमचे नी आमचे सेम असते’.

ठळक मुद्देतंत्रज्ञानाचा तरुणाईकडून होतोय उपयोग

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केवळ ‘तू मला आवडतेस’ हे सांगण्यासाठी प्रियकर ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर...’च्या ‘स्टाईल’मध्ये ‘लव्ह लेटर’ लिहावे व ते प्रेयसीला कुणाच्या तरी माध्यमातून द्यावे, हे चलन काळासोबत मागे पडताना दिसत आहे. आता तर ‘हायटेक’ जमान्यात थेट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘प्रपोज’ करण्यावर तरुणाईचा भर दिसून येत आहे. तऱ्हा कुठलीही असो मात्र सर्वांची प्रेमाची भावना सारखीच असते, अगदी त्या ओळींसारखी ‘प्रेम हे प्रेम असते तुमचे नी आमचे सेम असते’.‘व्हॅलेन्टाईन वीक’मध्ये पहिल्या दिवशी ‘रोज डे’ झाल्यानंतर प्रेमवीरांना प्रतीक्षा असते ती ‘प्रपोज डे’ची. आपल्या मनातील भावना सांगण्यासाठी प्रेमात पडलेले लोक या दिवसाची वाट पाहतात. त्यासाठी त्यांचे मित्र मैत्रिणीदेखील चांगली ‘फिल्डींग’ लावून ‘मदत’ करत असतात. चांगली तयारी करुन, कधी कधी पाठांतर केलेले संवाद बोलून, चांगलं गिफ्ट घेऊन त्या आवडत्या व्यक्तीला ‘प्रपोज’ केलं जातं. तिने होकार द्यावा यासाठी भरपूर प्रयत्न केले जातात. ‘प्रपोज डे’चे निमित्त साधून आपण आपल्या मनातली भावना बोलून दाखवली, याचं समाधान प्रपोज करणाऱ्याच्या मनात असते. ‘प्रपोज’ करण्याच्या नव्या पद्धती

  • विविध ‘अ‍ॅप्स’च्या माध्यमातून ‘व्हिडीओ’च्या माध्यमातून मनातील भावना मांडणे
  • ‘ऑनलाईन शॉपिंग’च्या माध्यमातून आवडत्या व्यक्तीपर्यंत ‘गिफ्ट’ व सोबतच पत्र पोहोचविणे
  • ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर शब्द नव्हे तर ‘इमोजी’तून भावना कळविणे
  • सांकेतिक भाषा किंवा दुसऱ्या देशाच्या भाषेतून भावना पोहोचविणे
  • ‘पेन ड्राईव्ह’च्या माध्यमातून ‘रेकॉर्डेड प्रपोज’ करणे

कुणावरही ‘फोर्स’ नको‘प्रपोज’ करणे म्हणजे मनातील प्रेमाची भावना समोरच्याला सांगणे असा होतो. मात्र समोरच्या व्यक्तीला ती भावना ऐकूनच घ्यायची नसेल किंवा ती व्यक्ती कुठल्या कामात व्यस्त असेल तर ‘फोर्स’ करण्याची आवश्यकता नाही. आवडत्या व्यक्तीच्या कलाकलाने घेणे महत्त्वाचे असते. जर पुढील व्यक्तीकडून नकार आला तर तो पचविण्याची तयारी हवी. एका नकारामुळे आयुष्य उद्ध्वस्त होत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. प्रेम जीव लावायला शिकविते, जीव घ्यायला किंवा द्यायला नाही हे विसरू नका.

टॅग्स :Valentine Weekव्हॅलेंटाईन वीकnagpurनागपूर