शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

मती फिरली अन् रेल्वेत चोरी केली; पोलिसांनी केले जेरबंद

By नरेश डोंगरे | Updated: April 7, 2025 21:47 IST

गावाला जाण्याऐवजी पोहचला कोठडीत

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : कार्यालयीन काम आटोपल्यानंतर गावाला परत जाण्याच्या तयारीत असताना त्याची मती फिरली. त्याने रेल्वेत चोरी केली अन् आता तो पोलिसांच्या कोठडीत पोहचला.

गोपाल सदाशिव कडके (वय २५) असे नाव असलेला अल्लीपूर (जि. वर्धा) येथील तरुण ५ एप्रिलला नागपुरात आला होता. नागपुरातील कामकाज आटोपल्यानंतर तो गावाला परत जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर पोहचला. ट्रेन नंबर १२६२४ चेन्नई सेंट्रल मेलच्या कोच नंबर बी-१ मध्ये पोहचला. या कोचमध्ये असलम अब्दुल हमीद खान (वय ५४) यांची मुलगी नागपूरहून विजयवाडा येथे जाण्यासाठी बसली होती. तीने आपली कॉलेज बॅग बर्थ क्रमांक ६३ वर ठेवली. बॅगमध्ये दीड लाख रुपये किंमतीचा आयपॅड, हेडफोन आणि रोख ५०० रुपये होते. या बॅगवर गोपालची नजर पडली अन् त्याची मती फिरली. त्याने ती बॅग उचलली आणि ट्रेनने वर्धा जाण्याचे कॅन्सल करून तो रेल्वे स्थानकाबाहेर पडला.

दरम्यान, बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीने तिच्या वडिलांना माहिती दिली. त्यावरून खान यांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून आरोपीला शोधण्यासाठी गाडी फलाट क्रमांक दोनवरून सुटण्यापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. नमूद गाडीच्या कोचमधून निळा जिन्स आणि काळा शर्ट घातलेला एक तरुण बाहेर पडताना दिसला. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तो धागा पकडून शोधाशोध केली आणि आरोपीला गणेशपेठ बस स्थानकानजिकच्या राहूल हॉटेलजवळ आज ताब्यात घेतले. चाैकशीत त्याच्याजवळून चोरीची बॅग आणि आयपॅडसह अन्य साहित्यही जप्त केले. चोरीच्या आरोपात अटक करण्यात आलेला आरोपी कडके याचा कोणताही क्राईम रेकॉर्ड नसल्याचे रेल्वेचे पोलीस सांगतात. ऐनवेळी मती फिरल्यामुळे बॅग उचलून तो पळून गेल्याचे प्राथमिक चाैकशीत त्याने रेल्वे पोलिसांना सांगितले आहे.तत्परतेने लावला छडा

चोरीची तक्रार दाखल झाल्यानंतर चोरीच्या घटनेचा तत्परतेने छडा लावून आरोपीला जेरबंद करण्याची कामगिरी रेल्वेच्या पोलीस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी पांडूरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गाैरव गावंडे यांच्या नेतृत्वात हवलदार पुष्पराज मिश्रा, तपासी अंमलदार भोयर, अमोल हिंगणे, प्रवीण खवसे आणि अजहर अली यांनी ही कामगिरी बजावली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी