शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला म्हणाले, घरी पोहोचतोय... अन् काही क्षणात आली मृत्यूची वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 11:17 IST

बेपत्ता मुलीला शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या बापाचा स्टार बसखाली येऊन अपघाती मृत्यू झाला. नागपुरातील गोंडवाना क्लबजवळ हा भीषण अपघात घडला. यामुळे काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.

ठळक मुद्देबेपत्ता मुलीच्या शोधासाठी गेले, स्टार बसने उडवले

नागपूर : बेपत्ता मुलीला शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या एका व्यक्तीने पत्नीला बुधवारी रात्री फोन केला. लवकर घरी पोहोचतो, असे हताशपणे म्हणाले. पाच मिनिटांनंतर त्यांच्याच मोबाईलवरून एकाने त्यांच्या कुटुंबीयांना फोन करून त्यांचा अपघातीमृत्यू झाल्याची वार्ता कळविली.

मन सुन्न करणारी ही अवस्था सुरेंद्रगडमधील शर्मा कुटुंबीयांच्या वाट्याला आली असून, त्यामुळे कुटुंबीयांमध्येच नव्हे तर शेजाऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे. स्टार बसने चिरडल्याने दिनेश शर्मा (वय ४७, रा. सुरेंद्रगड) यांचा करुण अंत झाला. बुधवारी रात्री गोंडवाना क्लबजवळ हा भीषण अपघात घडला. यामुळे काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.

या अपघातानंतर उपरोक्त धक्कादायक माहिती पुढे आली. काही दिवसांपूर्वीच शर्मा यांची मुलगी बेपत्ता झाली आहे. त्यामुळे हे संपूर्ण कुटुंब हवालदिल आहे. मुलीचा पत्ता लावण्यासाठी शर्मा रोज विविध भागात पायपीट करीत होते. त्यांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले असावे, असाही संशय आहे. त्यानुषंगाने उलटसुलट चर्चा कानावर येत असल्यामुळे मुलीच्या चिंतेने शर्मा कमालीचे व्यथित होते.

बुधवारी रात्री त्यांनी पत्नीला फोन करून लवकरच घरी परत येतो, असे सांगितले. यावेळी पत्नी आणि लहान मुलगी तसेच मुलगा घरी होते. पती घरी येत असल्याचे कळाल्याने पत्नी स्वयंपाकात गुंतली. त्यानंतर काही वेळेतच त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची वार्ता त्यांच्या कुटुंबीयांना मिळाली. ती ऐकून त्यांची पत्नी बेशुद्धच पडली. शेजाऱ्यांनी त्यांना डॉक्टरकडे नेले.

कुटुंबीयांच्या उधरनिर्वाहाचा प्रश्न

विशेष म्हणजे, शर्मा त्यांच्या कुटुंबीयांचा एकमात्र आधार होते. पानटपरी चालवायचे. डेली कलेक्शनचेही काम करायचे.यातून त्यांच्या कुटुंबीयांचा घरखर्च चालायचा. या घटनेमुळे शर्मा कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या उधरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू