शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नरभक्षी वाघिण अवनीला नागपुरात दिला अग्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 22:51 IST

यवतमाळ येथील पांढरकवड्यातील टी-१ नरभक्षी वाघिण अवनी हिला गोळी घातल्यानंतर शनिवारी नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वी मृत वाघिणीला पोस्टमार्टेमसाठी सकाळी गोरेवाडा येथील वन्यजीव बचाव केंद्रात आणण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणा(एनटीसीए)च्या नियमानुसार तिचे पोस्टमार्टेम करून येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देगोरेवाड्यात अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यवतमाळ येथील पांढरकवड्यातील टी-१ नरभक्षी वाघिण अवनी हिला गोळी घातल्यानंतर शनिवारी नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वी मृत वाघिणीला पोस्टमार्टेमसाठी सकाळी गोरेवाडा येथील वन्यजीव बचाव केंद्रात आणण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणा(एनटीसीए)च्या नियमानुसार तिचे पोस्टमार्टेम करून येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.यासाठी विशेषत्वाने अधिकाऱ्यांची एक चमू गठित करण्यात आली होती. या चमूमध्ये वनीकरण प्रदेशाचे क्षेत्रीय व्यवस्थापक जे.पी. त्रिपाठी, एनटीसीएचे प्रतिनिधी हेमंत कामडी, डब्ल्यूसीटी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी मिलिंद परिवक्कम, वन्यजीव पशुचिकित्सक डॉ. अजय पोहरकर, डॉ. शिरीष उपाध्ये, डॉ. पी.एम. सोनकुसळे व डॉ. बी.एम. कडू सहभागी होते. या चमूसमोरच शनिवारी दुपारी २ ते ५ वाजेदरम्यान वाघिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.छातीवर लागली होती गोळीवाघिणीच्या मागच्या डाव्या पायात बेशुद्ध करणाऱ्या औषधाचे इंजेक्शन (ट्रॅक्लायजिंग डार्ट) आढळून आले. यासोबतच तिच्या छातीच्या डाव्या बाजूला बंदुकीच्या गोळीची जखम आढळून आली. पोस्टमार्टेमदरम्यान परीक्षणासाठी वाघिणीच्या शरीरातून काही नमुने घेण्यात आले. प्राथमिक तपासात असे आढळून आले की, वाघिणीचा मृत्यू हृदय व श्वसनक्रिया बंद झाल्याने आणि रक्त वाहिल्यामुळे झाला आहे. ही कारवाई पेंच टायगर रिझर्व्हचे संचालक रविकिरण गोवेकर आणि गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक नंदकिशोर काळे यांच्यासमोर करण्यात आली.

 

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यू