शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

‘लिव्ह इन’चा दु:खद शेवट; काटाेलमध्ये प्रेयसीची तर कामठीत प्रियकराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2022 10:32 IST

दाेघेही तुमसर, जिल्हा भंडारा येथे नातेवाईकाकडे लग्नाला सोबत गेले. तिथे दाेघांमध्ये जाेरात भांडण झाले. याच भांडणात संजयने कविताला मारहाण केल्याने ती तुमसरहून माहेरी काटाेलला गेली तर संजय कामठीला आला हाेता. 

कामठी (नागपूर) : मागील काही वर्षांपासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीने काटाेल शहरात तिच्या माहेरी विषारी पावडर खाऊन आत्महत्या केली. ही बाब कळताच प्रियकरानेही फिनाईल प्राशन करून कामठीत आत्महत्या केली. प्रियकराची पत्नी तर प्रेयसीच्या पतीचे निधन झाल्यानंतर ‘ते’ दाेघेही एकत्र ‘लिव्ह इन’मध्ये राहात हाेते.

संजय शालिकराम गजभिये (४५, रा. छत्रपतीनगर, कामठी) व कविता वानखेडे (३५), अशी मृतांची नावे आहेत. दाेघेही मंगळवारी (दि. २४) तुमसर, जिल्हा भंडारा येथे नातेवाईकाकडे लग्नाला सोबत गेले. तिथे दाेघांमध्ये जाेरात भांडण झाले. याच भांडणात संजयने कविताला मारहाण केल्याने ती तुमसरहून माहेरी काटाेलला गेली तर संजय कामठीला आला हाेता. त्यातच कविताने बुधवारी (दि. २५) सकाळी ८ वाजताच्या सुमारास विषारी पावडर खाल्ले. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला काटाेल शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर तिला नागपूरला रेफर केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

कविताच्या भावाने ही माहिती संजयला बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास फाेनवर दिली. त्यानंतर त्याने घरी फिनाईल प्राशन केले. त्यामुळे त्याला कामठी शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती केले असता, रात्री ११ वाजताच्या सुमारास त्याचाही मृत्यू झाला. या प्रकरणात काटाेल व कामठी (नवीन) पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपासाला सुरुवात केली आहे.

तो विधूर, ती विधवा, दोघांची मने जुळली

संजयची पत्नी माधुरीचे आकस्मिक निधन झाल्यानंतर ताे कवितासाेबत राहायचा. त्याला माधुरीपासून साक्षी (१८) व वैभव (१७) ही दाेन मुले आहेत. कविता मूळची काटाेल शहरातील रहिवासी असून, तिचे पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश येथील दिलीप वानखेडे याच्याशी विवाह झाला हाेता. दिलीपच्या अपघाती मृत्यूनंतर ती संजयसाेबत कामठी शहरात राहायची.

टॅग्स :Deathमृत्यूkamthi-acकामठीkatol-acकाटोल