शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आधी जीवघेणा हल्ला केला मग विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 14:55 IST

जुने प्रेमसंबंध ठेवू न दिल्याच्या कारणावरून एका तरुणाने सून आणि तिच्या सासूवर जीवघेणा हल्ला केला. त्यात दोन्ही महिला जखमी झाल्या असून, घटनेनंतर लगेच आरोपी तरुणाने नजीकच्याच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्दे जुने प्रेमसंबंध ठेवू न दिल्याने घडला थरारउमरेड तालुक्यातील मकरधोकडा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जुने प्रेमसंबंध ठेवू न दिल्याच्या कारणावरून एका तरुणाने सून आणि तिच्या सासूवर जीवघेणा हल्ला केला. त्यात दोन्ही महिला जखमी झाल्या असून, घटनेनंतर लगेच आरोपी तरुणाने नजीकच्याच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. उमरेड तालुक्यातील मकरधोकडा येथे मंगळवारी (दि.७) मध्यरात्री घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

योगेश नितीन आंबुलकर (२५, रा. मकरधोकडा, ता. उमरेड) असे आत्महत्या करणाऱ्या आरोपी तरुणाचे नाव आहे. इंदिराबाई सुखदेव बेलखुडे (६०) व रोशनी महेंद्र बेलखुडे (२७) असे जखमी महिलांची नावे आहेत. यापैकी रोशनी हिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. दाेघींवरही नागपुरात उपचार सुरू आहे.

मंगळवारी सासू इंदिराबाई, सून रोशनी व आपल्या नातवंडासह घरी झोपून होत्या. रोशनीचा पती महेंद्र हा वेकोलि येथे सुरक्षा कर्मचारी असून, तो नाईट ड्युटीवर होता. दरम्यान मध्यरात्री १२.१५ वाजताच्या सुमारास इंदिराबाई लघुशंकेसाठी उठल्या. यावेळी त्यांना आरोपी योगेश आंबुलकर हा घरातील एका कोपऱ्यात बसलेला आढळून आला. सोबत त्याच्या हातात लोखंडी घण दिसला. इंदिराबाईंनी तू आत कसा आला, अशी विचारणा केली. घराच्या खिडकीतून आत आलो, असे त्याने उत्तर दिले.

खिडकीचा एक पल्ला उघडाच होता. अशातच इंदिराबाईने आरोपी योगेश यास हटकले. तुझे इतक्या रात्री अशाप्रकारे येणे योग्य नाही, असे म्हणताच त्याने दोन्ही हाताने लोखंडी घण उचलून डोक्यावर उजव्या बाजूस मारून जखमी करीत तिला दरवाजावर ढकलले. दरम्यान, आवाज आल्याने रोशनीला जाग आली तिने बाहेर येऊन पाहताच आरोपीने रोशनीवरही हल्ला करत छातीवर व डोक्यावर घणाने प्रहार करून तिला गंभीर जखमी केले.

इंदिराबाई आरडाओरड करीत घराबाहेर निघाली. नागरिकांची गर्दी जमली. त्यानंतर योगेशने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी फिर्यादी इंदिराबाई बेलखुडे यांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजीव लोले करीत आहेत.

बुधवारी मृतदेह बाहेर काढला

आरोपी योगेश आंबुलकर याने दोन्ही महिलांना जखमी केल्यानंतर दोघींनीही आरडाओरड सुरू केली. लागलीच आरोपी योगेशने घटनास्थळावरून पळ काढला. अवतीभवती गर्दी जमली. अशातच याेगेशने नजीकच्याच विहिरीत उडी मारली. त्याला नागरिकांनी वाचविण्याचाही प्रयत्न केला. परंतु त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर बुधवारी सकाळच्या सुमारास गावातील नागरिकांनी त्याचा मृतदेह विहिरीबाहेर काढला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी