शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

नागपुरातील मॉल, बाजार संकुल साडेचार महिन्यानंतर खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 22:11 IST

तब्बल साडेचार महिन्यानंतर मॉल आणि बाजार संकुल खुले झाले असून ग्राहकांच्या स्वागतासाठी मॉल संचालक सज्ज आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत.

ठळक मुद्दे व्यापाऱ्यांमध्ये उत्साह : ग्राहकांसाठी विशेष उपाययोजना, आर्थिक नुकसान भरून निघणे कठीण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : तब्बल साडेचार महिन्यानंतर मॉल आणि बाजार संकुल खुले झाले असून ग्राहकांच्या स्वागतासाठी मॉल संचालक सज्ज आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग पालन, मास्क आणि सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. या ठिकाणीही ऑड-इव्हन पद्धतीने मॉलमधील दुकाने सुरू राहणार असल्याने दुकानदार नाराज आहे. पहिल्या दिवशी ग्राहकांची गर्दी नव्हती.मॉल सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर दुकानदार खूश आहे. गेले साडेचार महिने दुकाने बंद असल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागले. बँकांचे कर्ज, कर्मचाऱ्यांचे पगार, इलेक्ट्रिक बिल, स्वच्छता आदींकरिता खर्च करावा लागत होता. मॉल सुरू करताना ऑड-इव्हन पद्धत नसावी, असे दुकानदारांचे मत आहे. मॉलमध्ये रेस्टॉरंट, थिएटर आणि फूडकोर्ट हे बंद आहेत. रेस्टॉरंट आणि फूड कोर्ट केवळ होम डिलिव्हरी करू शकतात. याशिवाय मॉलमध्ये क्रीडा प्रकारांना परवानगी नाही.श्री शिवम स्टोअरचे व्यवस्थापकीय संचालक हरीश मंत्री म्हणाले, स्टोर सुरू केल्याचा आनंद आहे. ग्राहक येण्यास दोन ते तीन दिवस लागतील. कुणी कर्मचारी दोन-चार दिवस सुटी घेत असेल तर त्याला आरोग्य प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. याशिवाय ३३ हजार चौरस फूटाच्या स्टोरमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आणि गर्दी होऊ नये म्हणून ४० ग्राहकांना परवानगी प्रवेश येणार आहे. मास्क व सॅनिटायझरची व्यवस्था आहे. स्टोरचे दोन लाख ग्राहक आहेत. गर्दी होऊ नये म्हणून ५ हजार लोकांना मॅसेज केले आहेत. व्हिडिओ कॉल व सोशल मीडियाद्वारे संदेश देण्यात येत आहेत. ग्राहकांनी ट्रायल केलेले कपडे स्टीम प्रेस करून २४ तासानंतर स्टोरमध्ये ठेवण्यात येणार आहे. शासनाच्या नियमांचे पालन करण्यात येत आहे.इटर्निटी मॉलचे व्यवस्थापक पारसनाथ जयस्वाल म्हणाले, या ठिकाणी थिएटरसह २१ दुकाने आहेत. ऑड-इव्हन पद्धत लागू आहे. त्यामुळे बुधवारी पूर्व-उत्तरमुखी दुकाने सुरू होती. पहिल्या दिवशी फारशी गर्दी नव्हती. पुढे गर्दी वाढणार आहे. मॉलमध्ये थिएटर, रेस्टॉरंट, फूड कोर्ट सुरू करण्यास परवानगी नाही.मॉल सुरू करताना घ्यायची काळजीफिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे.वॉशरूम व परिसर नियमितपणे सॅनिटाईज्ड करावा.ग्राहकांना मास्क आणि सॅनिटायझर पुरवावा.ग्राहकांचे तापमान मोजावेदुकानातील कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीवर भर द्यावा.शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

टॅग्स :Empress Mallएम्प्रेस मॉलnagpurनागपूर