वन विभागाच्या दुर्लक्षपणामुळे माळढोक संवर्धन धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 11:50 AM2020-10-15T11:50:57+5:302020-10-15T11:53:30+5:30

Nagpur News Wildlife माळढोक संवर्धनाची क्षमता असूनही येथील शेतमाळातून आता माळढोक हद्दपार व्हायला लागले आहे.

Maldhok bird ignored by forest department | वन विभागाच्या दुर्लक्षपणामुळे माळढोक संवर्धन धोक्यात

वन विभागाच्या दुर्लक्षपणामुळे माळढोक संवर्धन धोक्यात

googlenewsNext
ठळक मुद्देनानजपेक्षा अधिक सक्षमतामात्र संवर्धनाअभावी संख्या घटली

गोपालकृष्ण मांडवकर
नागपूर : वन विभागाने नानजमध्ये उभारलेल्या माळढोक अभयारण्यापेक्षा वरोरा-मार्डा परिसरातील वातावरण या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी पोषक आहे. मात्र या कामी वन विभागाचा कायदेशीरदृष्ट्या पुढाकार नाही, शेतकऱ्यांना योग्य प्रशिक्षण नाही, वास्तविकता डोळ्यासमोर ठेवून कायदे नाहीत, त्यामुळे माळढोक संवर्धनाची क्षमता असूनही येथील शेतमाळातून आता माळढोक हद्दपार व्हायला लागले आहे.

माळढोक संवर्धनासाठी या कामी आवड असणाऱ्या अधिकाऱ्यांनी भरपूर प्रयत्न केले. मात्र त्याला वन विभागाने म्हणावा तसा आधार दिला नाही. त्यामुळे अधिकारी बदलून गेले किंवा निवृत्त झाले की मोहीम थंडावते, असाच येथील अनुभव आहे. संजय ठाकरे हे मुख्य वनसंरक्षक असताना पयार्यी अधिवास निर्मिती व सेंद्रिय शेतीसाठी प्रयत्न झाले. पक्षांना रेडिओ कॉलर लावून अभ्यास केला गेला होता. मात्र पुढे हे कार्य सातत्याने चालले नाही. वनरक्षक लालसरे यांच्यासह काही सामाजिक संस्थांनीही यात पुढाकार घेतला होता.
१७ जुलै २००५ मध्ये झालेल्या एक दिवसीय माळढोक प्रगणनेमध्ये वरोरा-भद्रावती तालुक्यातील ४०० चौरस मीटर असंरक्षित क्षेत्र ६ अधिक माळढोक असल्याची नोंद झाली होती तर नानजमधील संरक्षित क्षेत्र ८५०० चौरस मीटर असून एवढ्या मोठ्या क्षेत्रात फक्त २२ ते २८ माळढोक (हुम) आढळले होते. यावरून या क्षेत्रातील पोषकता लक्षात येते. मात्र सध्या येथील माळढोक घटले असून ही संख्या फक्त ३ ते ४ असावी, असा अंदाज आहे.

वन विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहनाची हमी द्यावी. वास्तव लक्षात घेऊन कायदे व्हावे. माळढोकचा वावर असणारी जागा वन विभागाने अधिवास म्हणून घोषित करावी, शेतकरऱ्यांना बक्षीस रूपाने प्रोत्साहित करावे.
गोपाल ठोसर, माळढोक अभ्यासक

Web Title: Maldhok bird ignored by forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.