शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘वसुधैव कुटुंबकम’ प्रत्यक्षात आणा, आफ्रिकेतील मुलांवरील अन्याय दूर करा

By योगेश पांडे | Updated: March 21, 2023 16:45 IST

नागपूरच्या भूमीतून ‘सी-२०’मध्ये मान्यवरांचे आवाहन : मानवी मूल्यांच्या संवर्धनाच्या ‘रोडमॅप’ची गरज

नागपूर :नागपूरची भूमी ही सामाजिक परिवर्तनाची जननी म्हणून ओळखली जाते व याच शहरात सुरू असलेल्या ‘सी-२० समिट’दरम्यान हजारो किलोमीटर दूर असलेल्या अफ्रिका खंडातील वंचित मुलांवरील अन्याय दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याचा संकल्प घेण्यात आला. मानवी मूल्यांच्या संवर्धनावर मंगळवारी चिंतन-मनन होत असताना ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा मंत्र कृतीत आणायचा असेल तर त्याची सुरुवात अफ्रिका खंडात अतिशय हलाखीच्या स्थितीत आयुष्य काढणाऱ्या मुलांच्या संवर्धनापासून सुरू करण्यात यावी, असा देशविदेशातील मान्यवरांचा सूर होता.

‘जी-२०’अंतर्गत येणाऱ्या नागपुरात आयोजित ‘सी-२० समिट’मध्ये मंगळवारी मानवी मुल्यांच्या संवर्धनावर सखोल मंथन करण्यात आले. या सत्रादरम्यान १०० मिलियन कॅम्पेनचे जागतिक संचालक ओवेन जेम्स यांनी हा मुद्दा मांडला. अफ्रिका खंडातील स्थितीत अगोदरच वाईट होती व कोरोनानंतर त्यात आणखी भर पडली आहे. विशेषतः अफ्रिका सहारा उपखंडातील लोकसंख्येत २०१५ पासून सातत्याने वाढ होत असून त्या तुलनेत तेथे सोयीसुविधा व विकास जैसे थे आहे. तेथील बहुतांश लोकसंख्या दिवसाला २.१५ अमेरिकी डॉलर्सपेक्षा कमी रकमेत गुजराण करत आहेत.

मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक स्त्रोत असूनदेखील तेथील लोक विकासापासून दूरच राहिले आहेत. सर्वात दुर्दैवाची बाब म्हणजे उपखंडात बालकामगार व शाळाबाह्य मुलांची संख्या वाढली आहे. या मुलांना न्याय देण्यासाठी संपूर्ण जगाने एकत्रित यायला हवे. सी-२० च्या मंचावरून जगाने याबाबत संकल्प करावा असे आवाहन जेम्स यांनी केले.

‘युएन’ने धोरणांचा फेरविचार करावा

दुर्गानंद झा म्हणाले की, संयुक्त राष्ट्र संघटनेने मानवी हक्कांच्या संकल्पनेचा व धोरणांचा पुनर्विचार करायला हवा. मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणे व्यतिरिक्त, मानवी हक्कांची प्रादेशिक घोषणाही असावी. मानवी हक्कांचा वापर कोणत्याही देशाविरुद्ध धोरणात्मक साधन म्हणून केला जाऊ नये असे ते म्हणाले.

- सत्रात सहभागी मान्यवर

सेवा इंटरनॅशनलचे जागतिक समन्वयक श्याम परांडे, साहस डिसॅबिलिटी रिसर्च अँड केअर फाउंडेशनच्या अध्यक्ष नसीमा हुरझुक, आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक अभ्यास परिषदेच्या भारतातील शाखेच्या अध्यक्ष, डॉ. शशी बाला, अर्शा विद्या मंदिरचे स्वामी परमात्मानंदा, १०० मिलियन कॅम्पेनचे जागतिक संचालक ओवेन जेम्स, इंडियन सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नेटवर्क चे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष गुप्ता, युनायटेड कॉन्शियसनेस ग्लोबलचे संयोजक डॉ विक्रांत तोमर , गुवाहाटी येथील विवेकानंद सांस्कृतिक संस्था केंद्राचे अध्यक्ष, डॉ जोराम बेगी आणि सेंटर फॉर पॉलिसी ॲनालिसिसचे कार्यकारी अध्यक्ष दुर्गानंद झा.

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर