शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

भाजपा विरोधात ‘सर्जिकल स्ट्राईक’ करा; अशोक चव्हाण यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 22:07 IST

येत्या निवडणुकांत जनतेनेच सरकारविरोधात ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याचा रविवारी नागपुरात समारोप झाला.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा नागपुरात समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जनतेचा सर्व पातळ््यांवर अपेक्षाभंगच केला आहे. संविधान बदलण्याचा घाट घातलेल्या सरकारने व त्यांच्या विचारधारेने देशाचे वाटोळे केले आहे. येत्या निवडणुकांत जनतेनेच सरकारविरोधात ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याचा रविवारी नागपुरात समारोप झाला. यावेळी आयोजित जाहीर सभेदरम्यान ते बोलत होते.पोलीस लाईन टाकळी येथील सद्भावना पोलीस लॉन येथे झालेल्या या सभेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, सचिव आशिष दुवा, माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार, अखिल भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार, माजी आमदार उल्हास पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, नाना गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, मागील पाच वर्षांत भाजपचे पितळ उघडे पडले आहे. मतांसाठी भाजप नेते महात्मा गांधी यांचा गजर करत आहेत. मात्र त्यांना महात्मा गांधी यांची आठवण येत आहे की नथुराम गोडसेची हे एक कोडेच आहे. भाजपचे नेते उखडून फेकण्याची भाषा करत आहेत. काँग्रेसने मात्र कधीही अशी भाषा वापरली नाही. देशात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशदेखील सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. इतकेच काय तर साहित्य संमेलनात साहित्यिकांनाच येण्यास सरकार मनाई करत आहे. यासारखी दुर्दैवाची बाब नाही. सरकार लोकशाहीची विटंबनाच करत आहे. निवडणुका जवळ येत असताना भाजपाकडून जनतेला घोषणा करून नवीन गाजर दाखविण्यात येईल. मात्र जनतेने सावध व्हायला हवे, असे अशोक चव्हाण म्हणाले.मुत्तेमवार यांनी ‘मेट्रो रेल्वे’ चे क्रेडिट घेण्याचा भाजपा प्रयत्न करीत असल्याची टीका केली. यावेळी प्रदेश मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष डॉ.राजू वाघमारे, सरचिटणीस डॉ.बबनराव तायवाडे, अनंतराव घारड, माजी आ. आशिष देशमुख, प्रफुल्ल गुडधे, प्रवक्ते अतुल लोंढे, रामकिशन ओझा, उमाकांत अग्नीहोत्री, अतुल कोटेचा, अभिजित वंजारी, किशोर गजभिये, अमोल देशमुख, प्रा.प्रकाश सोनावणे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विकास ठाकरे यांनी प्रास्ताविक केले तर विशाल मुत्तेमवार यांनी संचालन केले.पांडे, चव्हाण यांनी टोचले नेत्यांचे कान- जाहीर सभेत बोलताना अविनाश पांडे तसेच अशोक चव्हाण या दोघांनीही शहरातील काँग्रेस नेत्यांचे कान टोचले. तीन राज्यांच्या निकालातून जनतेने केंद्र सरकारला बदलाचा इशारा दिला आहे. मात्र लोकसभेचे आव्हान मोठे आहे. अशा स्थितीत नेत्यांनी ‘मी’ पणा विसरायला हवा. काँग्रेस पक्ष भाषणांनी मजबूत होणार नाही. सर्वांनी एकोपा ठेवून काम करायला हवे, असा सल्ला अविनाश पांडे यांनी दिला. तर लोकसभा निवडणुका हे एकप्रकारे वैचारिक युद्धच आहे. यात सर्वांनी एकत्र मिळून हातभार लावायला हवा. कोण मोठा, कोण लहान हा विचार न करता एकोप्याने काम करा, अशी सूचना अशोक चव्हाण यांनी केली.सातवेळा झाले महात्मा गांधींना मारण्याचे प्रयत्नयावेळी उल्हास पवार यांनी संघ व हिंदू महासभेवर आरोप केले. संघ व हिंदू महासभेने सातवेळा महात्मा गांधी यांना मारण्याचे प्रयत्न केले. गांधींचे फोटो लावण्याचा नैतिक अधिकार भाजपाला नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तर १८ वेळा ब्रिटिशांना माफीनामा लिहून दिला होता. १९२५ नंतर ते एकदाही रत्नागिरी जिल्ह्याबाहेर पडले नाही व एकही आंदोलन केले नाही. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १९४२ च्या आंदोलनात नऊ दिवस कारावास भोगल्यावर इंग्रजांची माफी मागितली व पुढे ते कधीही तुरुंगात गेले नाही, असा दावा पवार यांनी केला.या वेळी माजी आ. यशवंत बाजीराव, मुकुंदराव पन्नासे, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, गिरीश पांडव, दीपक वानखेडे, अभिजित सपकाळ, राजू भोतमांगे, प्रमोदसिंग ठाकूर, युगलकिशोर विदावत, राजेश पायतोडे, ओवेस कादरी, सुभाष मानमोडे, बापु बरडे, राम कळंबे, त्रिशरण सहारे, विवेक निकोसे, नंदा पराते, हरीश ग्वालबंसी, नितीश ग्वालबंसी, अरुण डवरे, राजेश नगरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Congress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्रा