शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

अचूक डिजिटल सातबारा शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 21:26 IST

शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालकीहक्काबाबत सातबारा हे महत्त्वाचे दस्ताऐवज असून खरीप कर्जापासून सर्वच योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास होऊ नये. डिजीटल आॅनलाईन सातबारा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र दिनापासून घेतला आहे. शेतकऱ्यांना पिकाच्या नोंदीसह अनुषंगिक सर्व नोंदी अचूकपणे घेऊन डिजिटल सातबारा उपलब्ध करून द्यावा यासाठी नागपूर जिल्हा आदर्श ठरावा, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

ठळक मुद्देचंद्र्रशेखर बावनकुळे : विभागात ६० हजार डिजिटल सातबाराचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालकीहक्काबाबत सातबारा हे महत्त्वाचे दस्ताऐवज असून खरीप कर्जापासून सर्वच योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास होऊ नये. डिजीटल आॅनलाईन सातबारा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र दिनापासून घेतला आहे. शेतकऱ्यांना पिकाच्या नोंदीसह अनुषंगिक सर्व नोंदी अचूकपणे घेऊन डिजिटल सातबारा उपलब्ध करून द्यावा यासाठी नागपूर जिल्हा आदर्श ठरावा, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात शेतकऱ्यांना डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबाराचे वितरण शेतकºयांना पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते. महाराष्ट्र दिनापासून राज्यात सर्व शेतकºयांना सातबारा देण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यस्तरावर मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. नागपूर विभागीय स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आले, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्ह्यात ८२६४ तर विभागात ६०२०६ डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उपलब्ध झाला आहे.यावेळी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी आदी उपस्थित होते.प्रारंभी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी प्रास्ताविक केले.उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी आभार मानले.पहिला डिजिटल सातबाराशेतकऱ्यांना शेतीच्या मालकीहक्काबाबत महत्त्वाचे दस्ताऐवज असलेला पहिला डिजिटल सातबारा ज्योती चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा तयार करण्यात आला असून विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या हस्ते पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांना सन्मानपूर्वक देण्यात आला. डिजिटल सातबारा वितरणाचा शुभारंभ बचत भवन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रत्येक तालुकास्तरावरील पाच शेतकऱ्यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते डिजिटल सातबाराचे वितरण करण्यात आले.उत्कृष्ट काम केलेल्या तलाठ्यांचा सत्कारनागपूर जिल्ह्यात १९५६ गावांचा समावेश असून ७ लक्ष ६१ हजार सातबारांची संख्या आहे. त्यापैकी डिक्लेरेशन ३ चे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात आले तर ८ अ ची संख्या ६ लक्ष ८५ हजार आहे. जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या तलाठ्यांना तसेच डाटाबेस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. डिजिटलायझेशनचे काम उत्कृष्टपणे पूर्ण केल्याबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, जिल्हा माहिती तंत्रज्ञान अधिकारी धनंजय केसकर, तलाठी अजय खोब्रागडे यांचा सत्कार करण्यात आला.आॅनलाईन सातबारावरच योजनांचा लाभ द्यानागपूर विभागातील ७ हजार ३६१ गावात संगणकीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून ३१ मे पर्यंत विभागात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून डिजिटल सातबारा उपलब्ध करून देण्यात येईल. यापुढे हस्तलिखित सातबारा मिळणार नाही. कोणत्याही कामासाठी सातबारा न मागता आॅनलाईन सातबारा बघून कर्जासह शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचे आवाहन अनुप कुमार यांनी केले.

 

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयFarmerशेतकरी