लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मनपा शाळेतील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याला १ जुलैपासून सुरुवात केली आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड स्मार्टफोन आहेत त्यांनाच शिक्षण मिळत आहे. गरीब व मध्यमवर्गातील विद्यार्थी यापासून वंचित आहेत.या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ नये , यासाठी महापालिका प्रशासनाने त्यांना तात्काळ स्मार्ट फोन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे माजी गटनेते वेदप्रकाश आर्य यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना गुरुवारी दिलेल्या निवेदनात केली आहे.मनपाच्या शिक्षण विभागाने गेल्या काही दिवसात केलेल्या सर्वेक्षणात स्मार्टफोन असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार नियोजन करणे अपेक्षित होते. परंतु ऑनलाईन शिक्षण सुरू करताना या गरीब विद्यार्थ्यांचा विचारच करण्यात आलेला नाही .यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. महापालिका सभागृहात पाच दिवस चर्चा झाली. आरोप-प्रत्यारोप झाले परंतु विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची महापालिकेची जबाबदारी असताना गरीब विद्यार्थ्यांना स्मार्टफोन उपलब्ध करण्याबाबतचा विषय साधा चर्चेला आला नाही. मनपा प्रशासनाने आर्थिक परिस्थितीचा विचार न करता निधी उपलब्ध करून गरजू विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षणासाठी स्मार्टफोन उपलब्ध करावे, अशी मागणी वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.मनपाने निधी उपलब्ध करावामहापालिकेतील इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्मार्टफोन उपलब्ध करण्यासाठी मनपाने तातडीने निधी उपलब्ध करावा अन्यथा या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येईल. या विद्यार्थ्यांची संख्या ३६०१ इतकी आहे. यात नववीत १११२, दहावीत १९९५ अकरावी २१७ तर बारावीत २७७ विद्यार्थी आहेत. यातील ६० टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाही. या सर्वांना स्मार्टफोन द्यावा, अशी मागणी माजी शिक्षण सभापती गोपाल बोहरे यांनी केली आहे.
गरीब विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 01:47 IST
मनपा शाळेतील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याला १ जुलैपासून सुरुवात केली आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड स्मार्टफोन आहेत त्यांनाच शिक्षण मिळत आहे.
गरीब विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन उपलब्ध करा
ठळक मुद्दे वेदप्रकाश आर्य याची मनपा आयुक्तांकडे मागणी