आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये औषधी उपलब्ध करा : कार्यकारी महापौरांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 09:44 PM2020-05-21T21:44:28+5:302020-05-21T21:48:48+5:30

महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा सुरू असून निर्माणकार्यसुद्धा सुरू आहे. रुग्णालयामध्ये अँटी रेबिज इंजेक्शन व औषधांचा तात्काळ पुरवठा सुरू करण्याचे निर्देश कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांनी गुरुवारी दिले.

Make medicine available in isolation hospitals: Executive Mayor's orders | आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये औषधी उपलब्ध करा : कार्यकारी महापौरांचे आदेश

आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये औषधी उपलब्ध करा : कार्यकारी महापौरांचे आदेश

Next
ठळक मुद्देमनपा रुग्णालयांची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा सुरू असून निर्माणकार्यसुद्धा सुरू आहे. रुग्णालयामध्ये अँटी रेबिज इंजेक्शन व औषधांचा तात्काळ पुरवठा सुरू करण्याचे निर्देश कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांनी गुरुवारी दिले.
मनीषा कोठे यांनी आयसोलेशन हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. याप्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, धंतोली झोन सभापती लता काडगाये, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार तसेच हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
सद्याच्या परिस्थितीत हॉस्पिटलमधील कर्मचारीे १२-१२ तास सेवा देत आहेत. याचा विचार करता रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्याही वाढविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बाभुळखेडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रालाही कोठे यांनी भेट दिली. या प्राथमिक आरोग्य केंद्राची सुरक्षा भिंत तुटलेली असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने ती तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. शहरातील इतर रुग्णालयांच्या सुविधांविषयी मनीषा कोठे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मनपातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा व आरोग्य केंद्रांमधून शहराबाहेर प्रवास करणाºयांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रमाणपत्रांचाही आढावा त्यांनी घेतला.

Web Title: Make medicine available in isolation hospitals: Executive Mayor's orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.