शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

ई-वे बिलाची मर्यादा पाच लाख करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 23:27 IST

राज्यात ई-वे बिलाच्या अंमलबजावणीनंतर ५० हजार किमतीच्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी वाहतूकदारांना ई-वे बिल बंधनकारक झाले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांवर अतिरिक्त कागदपत्रांचा भार वाढला आहे. इतर राज्यात ही मर्यादा एक लाखापर्यंत आहे. महाराष्ट्रात ही मर्यादा ५० हजारांवरून पाच लाखांवर नेण्याची मागणी फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्रने (फॅम) वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देफॅम पदाधिकाऱ्यांची मागणी : सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात ई-वे बिलाच्या अंमलबजावणीनंतर ५० हजार किमतीच्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी वाहतूकदारांना ई-वे बिल बंधनकारक झाले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांवर अतिरिक्त कागदपत्रांचा भार वाढला आहे. इतर राज्यात ही मर्यादा एक लाखापर्यंत आहे. महाराष्ट्रात ही मर्यादा ५० हजारांवरून पाच लाखांवर नेण्याची मागणी फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्रने (फॅम) वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाद्वारे केली. यावेळी राज्यमंत्री राज पुरोहित उपस्थित होते.फॅमचे अध्यक्ष विनेश मेहता यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आणि ई-वे बिलाची प्रक्रिया सरळसोपी करण्याची मागणी केली. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल राज्यांनी मर्यादा ५० हजारांवरून एक लाखापर्यंत वाढविली आहे. गुजरात राज्यात केवळ १९ वस्तूंना ई-बिलाच्या टप्प्यात बंधनकारक केले तर उर्वरित वस्तूंना सूट दिली आहे. दोन ते तीन राज्यांनी टेक्सटाईल इंडस्ट्रीला ई-वे बिलातून सूट दिली आहे. अशीच सूट राज्य शासनाने द्यावी.सुधीर मुनगंटीवार म्हणाले, अन्य राज्यांनी ई-वे बिलाच्या मर्यादेत केलेल्या बदलांवर जीएसटी कौन्सिलने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. एक राष्ट्र एक कर अशी संकल्पना आहे. संघटनेची मागणी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत उचलून धरणार आहे. ई-वे बिलामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यांनाही अडचणी येत आहेत. महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल, असे ते म्हणाले. राज्यांतर्गत माल पाठविण्यासाठी टेक्सटाईल उद्योगाचा विचार करण्याचे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले.शिष्टमंडळात फॅमचे महासचिव आशिष मेहता, सचिव प्रीतेश शाह, कमलेश शाह, परेश कडकिया, निमित शाह, उपाध्यक्ष राजेंद्र भालरिया, कोषाध्यक्ष उत्तम जैन, कार्यकारिणी समिती सदस्य राजेश जोशी, किशोर शाह, समीर कनकिया, नीलेश शाह आणि असोसिएशनच्या अन्य सदस्यांचा समावेश होता.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारnagpurनागपूर