शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
4
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
5
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
6
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
7
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
8
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
9
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
10
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
11
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
13
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
14
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
15
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
16
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
17
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
18
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
19
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
20
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश

गुजरातमध्ये बहुमत, पण जागा घटण्याचे संघधुरिणांनी केले होते भाकीत : मतदानवाढीसाठीचे प्रयत्न ठरले अपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 18:39 IST

गुजरात निवडणुकांच्या निकालासंदर्भात बहुतांश ‘एक्झिट पोल’चे आकडे चुकीचे ठरले व १०० जागा मिळविताना पक्षाची दमछाक झाली.

ठळक मुद्देमतदानवाढीची ‘बेरीज वजाबाकी’ चुकली

योगेश पांडे

आॅनलाईन लोकमतनागपूर : गुजरात निवडणुकांच्या निकालासंदर्भात बहुतांश ‘एक्झिट पोल’चे आकडे चुकीचे ठरले व १०० जागा मिळविताना पक्षाची दमछाक झाली. मात्र पक्षासमोर हीच स्थिती उद्भवणार असल्याचे भाकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अभ्यासातून समोर आले होते. याबाबत संघधुरिणांनी सार्वजनिकपणे वक्तव्य केले नव्हते. मतदान न वाढल्यामुळे भाजपला बहुमत मिळेल, मात्र मागील वेळच्या तुलनेत जागा घटतील हे संघाचे पदाधिकारी अंतर्गत गोटात दाव्याने सांगत होते. नेमकी हीच बाब खरी ठरली असून संघाचे गणित बरोबर निघाल्याचे दिसून येत आहे.गुजरातला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यात संघाची मौलिक भूमिका राहिलेली आहे. लोकसभा निवडणुकांच्या वेळी संघ स्वयंसेवकांनी उत्तर प्रदेशसह गुजरातमध्येदेखील सक्रियपणे प्रचार केला होता व त्यांचे निकाल जगाने पाहिले होते. त्यानंतर प्रत्येक राज्यात संघ सक्रिय प्रचारापासून दूर राहिला. परंतु मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी संघाने बरेच प्रयत्न केले.गुजरातमध्येदेखील मतदानाचा टक्का वाढावा व भाजपासाठी सकारात्मक वातावरणनिर्मिती व्हावी, यासाठी संघ परिवाराच्या विविध संस्थांना पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभत होते. संघ परिवाराशी जुळलेल्या कुटुंबातून १०० टक्के मतदान झाले पाहिजे यासाठी स्वयंसेवक व प्रचारक कामाला लागले होते. स्वयंसेवकांनी भाजपाचे नाव घेऊन प्रचार न करता तरुणांमध्ये मतदानाबाबत जागरुकता निर्माण करण्यावर भर दिला व ‘हर घर, एक व्होट’ ही मोहीमच राबविण्यात आली. संघाच्या वरिष्ठ पातळीहून यासाठी विशेष नियोजनदेखील करण्यात आले होते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला पाहिजे, अशी सूचनादेखील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मागील वर्षीच केली होती.एकीकडे स्वयंसेवक मतदानवाढीसाठी प्रयत्न करत असताना संघाने अंतर्गत सर्वेक्षणदेखील केले होते. यानुसार मतदानाच्या पहिल्या टप्प्यात केवळ ६६.७५ टक्के मतदान झाल्यानंतर संघाच्या एका राष्ट्रीय पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही भाजपसाठी धोक्याची घंटा असल्याचे म्हटले होते. जर दुसऱ्या फेरीत मतदानाची टक्केवारी अशीच राहिली तर पक्षाला बहुमत मिळेल, मात्र शंभरी गाठताना दमछाक होईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. जर मतदानाचा आकडा ७२ टक्क्यांहून अधिक गेला तरच ११५ हून अधिक जागा येतील, असे ते म्हणाले होते.मतदानवाढीची ‘बेरीज वजाबाकी’ चुकलीगुजरातमध्ये मतदानवाढीसाठी संघाचे प्रयत्न अपुरे पडले. २०१२ च्या निवडणुकांत गुजरातमध्ये ७१.३२ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यंदा मतदानाचा आकडा वाढेल हा संघाचा अंदाज फोल ठरला. गुजरातमध्ये दोन्ही टप्प्यांत सरासरी ६८.४१ टक्केच मतदान झाले आणि येथेच जागांचे गणित बिघडले. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017