शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण प्रणालीतील मेंटेनन्स शंकेच्या विळख्यात : शहरासह जिल्ह्यावर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:42 IST

बुटीबोरी येथे देखभालीच्या (मेंटेनन्स) नावावर बुधवारी सकाळी वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. यामुळे नंतर वितरण प्रणालीत समस्या येणार नाही, ही अपेक्षा होती. परंतु रात्री १२.३० वाजेपर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता. महावितरण यावर, जम्पर तुटल्याचे सांगत आहे. मात्र, मेंटेनन्सच्याच दिवशी हे तुटलेच कसे, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रामदासपेठ, जयताळासह शहरातील अन्य भागालाही याचा फटका बसल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्दे पावसाळ्याच्या तोंडावर महावितरणाला आठवले बेरोजगार अभियंता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुटीबोरी येथे देखभालीच्या (मेंटेनन्स) नावावर बुधवारी सकाळी वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. यामुळे नंतर वितरण प्रणालीत समस्या येणार नाही, ही अपेक्षा होती. परंतु रात्री १२.३० वाजेपर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता. महावितरण यावर, जम्पर तुटल्याचे सांगत आहे. मात्र, मेंटेनन्सच्याच दिवशी हे तुटलेच कसे, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रामदासपेठ, जयताळासह शहरातील अन्य भागालाही याचा फटका बसल्याचे समोर आले आहे.विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने जेव्हा ‘मेंटेनन्सबाबत माहिती घेतली, तेव्हा या वर्षी मेंटेनन्सची निविदाच निघाली नसल्याचे पुढे आले. महावितरणने तीन वर्षांसाठी मेंटेनन्साठी निविदा मागविल्या होत्या. परंतु याच्या किमती खूप जास्त असल्याने कंत्राटदारांनी या निविदाच भरल्या नाहीत. या दरम्यान विनातयारी व पुरेसे मनुष्यबळ नसताना महावितरणने पावसाळ्यापूर्वीच्या कामाची तयारी सुरू केली आहे. महावितरणचे म्हणणे आहे की, हे काम जुने कंत्राटदार करीत आहे.सूत्रानुसार, जुन्या कंत्राटदाराने नवीन निविदेसाठी अर्जच केला नाही. त्याने योग्यपद्धतीने मेंटेनन्सचे काम केले नसल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. धक्कादायक म्हणजे, देखभालीच्या नावाखाली वीज बंद केली जात असल्यचाही आरोप होत आहे.विजेची मोठी रक्कम मोजूनही नागरिक त्रस्तहवा चालल्याने किंवा पाऊस आल्याने अचानक वीजपुरवठा बंद होतो. विजेची मोठी रक्कम भरूनही नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागते. या समस्येला घेऊन महावितरणने २६ मार्च २०१५ रोजी अध्यादेश काढून बेरोजगार अभियंत्यांची यात मदत घेण्याचा निर्णय घेतला. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनीही याबाबत निर्देश दिले होते. त्यांनी वेगळे ‘पोर्टल’ही तयार करण्याच्याही सूचना दिल्या होत्या.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज