शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच पदाचे आरक्षण पूर्वीप्रमाणेच कायम ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 00:28 IST

Sarpanch reservation, nagpur news काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश भोयर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र पाठवित सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीपूर्वी काढल्याप्रमाणेच कायम ठेवण्यात यावे अशी मागणी करीत महाविकास आघाडी सरकारला घरचा अहेर दिला आहे.

ठळक मुद्देभोयर यांचे ग्रामविकास मंत्र्यांना पत्र : महाविकास आघाडीला घरचा अहेर

लोकमत  न्यूज  नेटवर्क

कामठी : ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्याच्या निर्णयावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारची कोंडी करणे सुरू केले आहे. मात्र आता काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश भोयर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र पाठवित सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीपूर्वी काढल्याप्रमाणेच कायम ठेवण्यात यावे अशी मागणी करीत महाविकास आघाडी सरकारला घरचा अहेर दिला आहे.राज्यातील १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होऊ घातले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील १३० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नागपूरसह राज्यातील ७ जिल्ह्यात सरपंच पदाचे आरक्षण आधीच जाहीर करण्यात आले होते. ग्रामविकास मंत्रालयाने १६ डिसेंबर रोजी निर्णय घेत सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करण्याचे स्पष्ट केले आहे. यात आधी काढण्यात आलेले आरक्षण रद्द होणार असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले होते. याला भाजप, रासपसह अ.भा.सरपंच परिषदेने विरोध दर्शविला होता. सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करण्याच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या निर्णयामुळे ग्रामीण भागात संभ्रम निर्माण झाल्याचे भोयर यांनी पत्रात म्हटले आहे. नगरपालिकेचे नगराध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महानगरपालिकेच्या महापौरांची आरक्षणाची सोडत निवडणुकीपूर्वीच जाहीर होत असताना ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचे भोयर यांनी म्हटले आहे. इकडे विधान परिषद निवडणुकीत मिळालेल्या दमदार विजयानंतर ग्रामपंचायतीच्याही निवडणुकाही एकत्र लढायच्या, अशी भूमिका महाविकास आघाडीचे राज्यातील नेते घेत आहेत. मात्र काँग्रेसच्याभोयर यांच्या पत्रामुळे सरपंच पदाच्या आरक्षणाच्या मुद्यावर महाविकास आघाडीत विसंवाद असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात या मुद्यावर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा राजकीय कलगीतुरा आणखी रंगणार, हे निश्चित.

टॅग्स :sarpanchसरपंचreservationआरक्षण