शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरची मुख्य ओळख झिरो माईल हीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 21:58 IST

आॅरेंज सिटी नागपूरची ओळख ही ‘झिरो माईल’ आहे. परंतु मेट्रो रेल्वेतील अधिकारी मात्र माहीत नाही ही ओळख बदलविण्याच्या तयारीत का आहेत. इतकेच नव्हे तर जाहिरातीसाठीसुद्धा त्याचा उपयोग करणार आहे. त्यामुळे नवीन ओळख प्रस्थापित करण्याचा दावा करणारी मेट्रो रेल्वे त्याचा व्यावसायिक उपयोग कसा काय करू शकते? स्पेशल प्लानिंग अ‍ॅथॉरिटीचा दर्जा मिळाल्याने मेट्रो असे करू शकते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ठळक मुद्देशहराची ओळख बदलण्याच्या तयारीत मेट्रोमुंजे चौकातील ‘क्राऊन’ होणार उत्पन्नाचे साधन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅरेंज सिटी नागपूरची ओळख ही ‘झिरो माईल’ आहे. परंतु मेट्रो रेल्वेतील अधिकारी मात्र माहीत नाही ही ओळख बदलविण्याच्या तयारीत का आहेत. इतकेच नव्हे तर जाहिरातीसाठीसुद्धा त्याचा उपयोग करणार आहे. त्यामुळे नवीन ओळख प्रस्थापित करण्याचा दावा करणारी मेट्रो रेल्वे त्याचा व्यावसायिक उपयोग कसा काय करू शकते? स्पेशल प्लानिंग अ‍ॅथॉरिटीचा दर्जा मिळाल्याने मेट्रो असे करू शकते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.असे सांगितले जाते की, मुंजे चौकात उभारण्यात येत असलेल्या मेट्रो स्टेशनच्या वर (मुकुट) ‘क्राऊन’ लावण्यात येणार आहे. ते स्टील आणि पॉली कार्बोनेटच्या मदतीने उभारले जाईल. सीताबर्डी मेट्रो स्टेशनची उंची ४० मीटर असेल. त्याच्यावर क्राऊन चढवण्यात येईल. त्याची उंची १४ मीटर असेल. २५ बाय ३५ मीटरचे बांधकाम असेल. क्राऊनच्या आतील भाग ‘डोम’ आकाराचा असेल. येथे जाहिरातबाजी करता येईल. अगोदर अशी योजना नव्हती. परंतु आता नवीन ओळख निर्माण करण्याच्या नावावर कमाईचा नवीन फंडा महामेट्रोने शोधला आहे. मुंजे चौक सीताबर्डीतील इंटरचेंज स्टेशन हे नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा केंद्रबिंदू म्हणजेच जंक्शन राहणार आहे. येथून नागरिकांना शहराच्या चारही दिशेने मेट्रोने प्रवास करता येईल.झिरो माईल असेल आकर्षणाचे केंद्रशहरातील झिरो माईल केवळ शहरातील नागरिकांसाठीच नव्हे तर बाहेरच्या पर्यटकांसाठीसुद्धा नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिलेले आहे. झिरो माईल शहराची ऐतिहासिक ओळख आहे. त्याचा एक सुवर्ण इतिहास आहे. इंग्रजांच्या काळात झिरो माईल बनविण्यात आले होते. हे त्यावेळचे देशाचे केंद्रबिंदू होते. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी याची माहितीसुद्धा आहे. परंतु ते आता नागपूर शहराची नवीन ओळख निर्माण करण्याचा तयारीत आहेत.

टॅग्स :Zero Mileझीरो माईलnagpurनागपूर