शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात चारित्र्यावर संशय घेऊन महिमाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 21:06 IST

चारित्र्यावर संशय आल्यामुळे आसिफ ताज याने महिमा विटोलेचा खून केला. प्रेम विवाहाच्या दीड वर्षानंतरच पत्नीची हत्या करणारा आसिफ पकडल्यानंतर मानसिक तणावात असल्याचे सांगत आहे. प्रकरणातील सत्यता लपविण्यासाठी तो लपवाछपवी करीत असल्याची शंका आहे.

ठळक मुद्देआरोपी आसिफने सत्य दडविल्याची शंका

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : चारित्र्यावर संशय आल्यामुळे आसिफ ताज याने महिमा विटोलेचा खून केला. प्रेम विवाहाच्या दीड वर्षानंतरच पत्नीची हत्या करणारा आसिफ पकडल्यानंतर मानसिक तणावात असल्याचे सांगत आहे. प्रकरणातील सत्यता लपविण्यासाठी तो लपवाछपवी करीत असल्याची शंका आहे.आसिफने ३० एप्रिलला रात्री मानकापूर ठाण्याजवळ शिवनगरात २० वर्षीय महिमाचा खून केला होता. आसिफ आधी मानकापूर परिसरात राहत होता. त्याचे दोन-तीन वर्षे महिमासोबत प्रेमसंबंध होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही दीड वर्षापूर्वी पती-पत्नीसारखे राहु लागले. महिमाला कुटुंबीय आणि इतर नागरिकांनी आसिफपासून दूर राहण्याबाबत समजवले होते, परंतु तिने कुणाचेच ऐकले नाही. पाच-सहा महिन्यानंतर दोघात भांडणे होऊ लागली होती. महिमा आसिफला सोडून आईवडिलांच्या घरी राहू लागली. महिमा गेल्यानंतर आसिफला तिचे इतरासोबत प्रेमसंबंध असल्याची शंका येऊ लागली. या गोष्टीवरून तो महिमासोबत वाद घालत होता. महिमाने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला होता. ३० एप्रिलला रात्री आसिफने चर्चा करण्याच्या बहाण्याने महिमाला घराजवळ बोलावले. आसिफच्या मते त्याने महिमाला सोबत राहण्यासाठी समजावले. तिने नकार दिला. दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान त्याने महिमाचा खून केला. त्याने महिमाचा गळा कापला होता. आसिफच्या मते तो महिमावर प्रेम करायचा. त्यामुळे अशा पद्धतीने त्याने तिचा खून करणे आश्चर्याची बाब आहे. यात आसिफ खरी हकीकत लपवित असल्याची शंका पोलिसांना आहे. तो ३ मे पर्यंत पोलीस कोठडीत आहे. महिमाच्या खुनामुळे मानकापूर ठाण्याच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर