नागपूर : उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदेसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवींचा कॅश व्हिडिओ समोर आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी या व्हिडिओवरून शिंदेसेना आणि अजित पवार गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.
दळवी यांनी दानवेंचे आरोप फेटाळत व्हिडीओ मॉर्फ असल्याचा आरोप केला आहे. शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी या व्हिडिओमागे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असल्याचा आरोप केला होता. तटकरे यांनी याला बुधवारी उत्तर दिले.
आ. दळवी देशभक्त : तटकरे
जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी, मधु दंडवते या थोर मालिकेत महेंद्र दळवी हे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यावरील आरोप हे देशावरील आरोप आहेत. त्यामुळे त्यांची आणि त्यांच्यावरील आरोपांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. या सर्व गोष्टींची मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब चौकशी करावी आणि याचा तपशील हिवाळी अधिवेशनाच्या पटलावर ठेवावी. राष्ट्रसंतांवरील आरोप चुकीचे आहेत. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, असे एकामागून एक टोले लगावत तटकरे यांनी दळवींवर उपरोधिक टीका केली. तसेच या व्हिडिओशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बी प्लस किंवा बी श्रेणीतील (विजयाचा विश्वास आहे पण शंभर टक्के खात्री नाही) अशा जागांवर पक्षजनांबरोबरच अन्य पक्षांतील प्रभावी व्यक्तीला किंवा राजकारणाशी संबंध नाही पण मोठी सामाजिक प्रतिष्ठा आहे अशा व्यक्तीला उमेदवारी देण्याचा विचार केला जाईल.
दिल्लीतील सध्याच्या राजकारणाचा विचार करून मित्रपक्षांना सोबत घ्यावे. युतीचा विषय आपल्याला बंद करायचा नाही. शिवाय मित्रपक्षाच्या एखाद्या नेत्याने आपल्या उमेदवाराविरोधात किंवा नेत्याविरोधात काही विधान केले तर तुम्ही त्यावर प्रतिक्रिया देऊ नका.
ट्रिपल इंजिन सरकार (केंद्र, राज्य व महापालिका) आले तरच शहराचा विकास झपाट्याने होईल
यावर प्रचारामध्ये फोकस करून तसे मतदारांना पटवून द्या.
दळवींचा प्रतिटोला
सुनील तटकरे हे राजकारणातील संत आहेत, असा प्रतिटोला दळवी यांनी लगावला आहे. तटकरे आक्षेपार्ह बोलतात. महायुतीत जी काही दुही माजली आहे त्याचे कर्तेकरविते तटकरे हेच आहेत, असेही ते म्हणाले.
दानवेंनी समोर आणलेला व्हिडिओ तटकरे यांनीच दिल्याच्या आरोपावर दळवी ठाम आहेत. सध्या उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे कुठलेही काम उरलेले नाही. म्हणूनच ‘मातोश्री’ आणि उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी ते असे काम करत आहेत.
दानवेंकडे अजून कुठले फोटो व्हिडीओ असतील तर त्यांनी कुठेही यावे, त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचे आव्हान दळवींनी दिले आहे. त्याचवेळी अंबादास दानवे यांना आमदारकीचे डोहाळे लागल्याचा आरोपही केला.
दरम्यान, दळवी यांनी दानवेंना मानहानीची नोटीस बजावली असून योग्य खुलासा न झाल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
Web Summary : A cash video of MLA Dalvi triggered accusations between Shinde Sena and Ajit Pawar group. Dalvi alleges video morphing, implicating Tatkare, who denies involvement. Dalvi sarcastically calls Tatkare a 'saint,' accusing him of creating discord in Mahayuti. He also challenges Danve, threatening defamation action.
Web Summary : विधायक दलवी के एक नकद वीडियो ने शिंदे सेना और अजित पवार गुट के बीच आरोप-प्रत्यारोप शुरू कर दिए। दलवी ने वीडियो को मॉर्फ्ड बताया और तटकरे को शामिल किया, जिन्होंने इनकार किया। दलवी ने व्यंग्यात्मक रूप से तटकरे को 'संत' कहा, और महायुति में कलह पैदा करने का आरोप लगाया। उन्होंने दानवे को चुनौती दी, और मानहानि की कार्रवाई की धमकी दी।