शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात जनमित्रांना गुंडांकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 19:26 IST

महावितरणच्या वीजवाहिनीत असलेला दोष दुरुस्त करण्यासाठी जनमित्राने वीजपुरवठा बंद केल्याने चिडलेल्या एका गावगुंडाने मारहाण केल्याची घटना हिंगणा परिसरात घडली. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना मोहपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तेलगाव येथे घडली.

ठळक मुद्देमहावितरण : पोलिसात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महावितरणच्या वीजवाहिनीत असलेला दोष दुरुस्त करण्यासाठी जनमित्राने वीजपुरवठा बंद केल्याने चिडलेल्या एका गावगुंडाने मारहाण केल्याची घटना हिंगणा परिसरात घडली. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना मोहपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तेलगाव येथे घडली.महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, महावितरणच्या हिंगणा शाखा कार्यालयात कार्यरत असलेले प्रकाश रामटेके रा. जरीपटका, नागपूर हे आपल्या सहकाऱ्यांसह बुधवारी राजीवनगर परिसरात सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास वीजवाहिनीतील झालेला बिघाड दुरुस्तीसाठी गेले होते. यासाठी त्यांनी परिसरातील वीजपुरवठा काही काळासाठी बंद केला. वीजपुरवठा बंद केल्याचे समजताच या परिसरात गुंड प्रवृत्तीच्या मोनू खान नामक इसमाने मला न विचारता वीजपुरवठा बंद का केला? असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि नंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी प्रकाश रामटेके यांनी हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर आरोपी मोनू खान याच्या विरोधात भादंविच्या कलम २९४, ५०६ (ब ), ३२३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.याअगोदरदेखील क्षुल्लक कारणावरून नागपूर ग्रामीण भागात महावितरणच्या जनमित्रावर हल्ले झाले असता पोलिसात तक्रार दाखल केल्यावर आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.आरोपी खान याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याच्या विरोधात अजामीनपात्र कलमाचा वापर करून महावितरण जनमित्रांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. अशाच प्रकारची घटना मोहपा उपविभागातील तेलगाव परिसरात २८ मे रोजी घडली. येथे अर्जुन हेडाऊ यांना मारहाण करण्यात आली असून, महावितरणकडून पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणEmployeeकर्मचारी