शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात महावितरण आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 20:03 IST

वीज बिल थकबाकी वसुलीसाठी जाणाऱ्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे प्रकार राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. याला गांभीर्याने घेऊन मारहाण करणाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत कठोर पोलीस कारवाई करण्याबाबत आग्रही असल्याचे संकेत महावितरण प्रशासनाने दिले आहेत.

ठळक मुद्देकठोर पोलीस कारवाईचा आग्रह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज बिल थकबाकी वसुलीसाठी जाणाऱ्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे प्रकार राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. याला गांभीर्याने घेऊन मारहाण करणाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत कठोर पोलीस कारवाई करण्याबाबत आग्रही असल्याचे संकेत महावितरण प्रशासनाने दिले आहेत. अशा घटनांत आरोपींविरोधात भादंविच्या कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.महावितरण ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असल्याने नफा कमावणे, हा महावितरणचा उद्देश नाही. मात्र महावितरणचे अस्तित्व हे विकलेल्या प्रत्येक युनिट विजेचे पैसे वसूल होण्यावर अवलंबून आहे. वीज बिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्याने महावितरणला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता ग्राहकांनी वीज देयकांचा नियमित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.महावितरण कर्मचारी ऊन, वारा, पावसात ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम करीत असतात. मात्र अनेकदा त्यांना ग्राहकांच्या रोषाला विनाकारण बळी पडावे लागते. परंतु ज्या शासकीय कर्मचाऱ्यांचा थेट जनतेशी प्रत्यक्ष संबंध येतो व ज्यांना जनतेच्या रोषाला बळी पडावे लागते व प्रसंगी मारहाण होते अशांसाठी भादंविचे कलम ३५३ या कलमान्वये आरोपीला कठोर शिक्षेची तरतूद आहे. या कलमाचा आधार घेत मागील काही दिवसांत झालेल्या हल्ल्यातील घटनांमध्ये महावितरणने हल्लेखोरांविरोधात कठोर भूमिका घेतल्याने बहुतांश आरोपींना अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी महावितरण प्रशासन पाठपुरावा करीत आहे.वीज कर्मचाऱ्यांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता, महावितरण प्रशासनाने आरोपींना तात्काळ अटक व्हावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याकरिता प्रशासनाने संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. ‘वीज थकबाकी वसूल करायची नाही, विजेची चोरी पकडायची नाही, गळती थांबवायची नाही, शासकीय सेवा या मोफत वापरण्यासाठीच असल्याच्या थाटात काही ग्राहक वागत असल्याने महावितरणपुढे ग्राहकांकडील थकबाकीचा डोंगर उभा राहिला आहे. थकबाकी वसूल केल्याशिवाय ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा करणे अशक्य असल्याने अशा पद्धतीने महावितरणचा कारभार कसा चालवायचा, असा प्रश्न महावितरणपुढे निर्माण झाला आहे.कर्मचारी काम तरी कसे करणार?महावितरण कार्यालयांना घेराव घालणे, कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवणे, तोडफोड-जाळपोळ करणे, हे प्रकार होत असतील तर महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम तरी कसे करायचे?' असा प्रश्न कर्मचारी संघटना वारंवार उपस्थित करीत आहेत.कठोर दंडाची तरतूदवीज कर्मचाऱ्यांना मारहाण करणाºयाविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हे नोंदविण्याची विनंती महावितरण प्रशासनाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना केली असून, कलम ३५३ नुसार आरोपीला दोन वर्षापर्यंत कैद आणि दंडाची तरतूद आहे. कलम ३३२ नुसार तीन वर्षापर्यंत कैद आणि दंडाची तरतूद असून, कलम ५०४ व ५०६ नुसार प्राणांकित हल्ल्याच्या आरोपाखाली कठोर शिक्षेची तरतूद आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणEmployeeकर्मचारी