शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:42 IST

वीज बिल न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या मूळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देराज्यातील ९७ हजार ग्राहकांना मिळणार लाभ : कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वीज बिल न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या मूळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ करण्यात येणार आहे. राज्यात सुमारे ९७४६४ औद्योगिक ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येईल व त्याद्वारे सुमारे २३१ कोटीचा व्याज व विलंब आकारावरील सवलत मिळवता येईल.नागपूर परिमंडळात येणाऱ्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात ५,१५७ वीज ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. या वीज ग्राहकांकडे ६ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी आहे. वरील वीज ग्राहकांकडे मूळ थकबाकी २ कोटी ६२ लाख रुपये असून त्यावरील व्याजाची रक्कम ३ कोटी ८२ लाख रुपये आहे. ३ लाख रुपये विलंब शुल्कापोटी थकले आहेत.राज्यातील ज्या औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे अशा ग्राहकांसाठी महावितरणने १ जून २०१८ ते ३१ आॅगस्ट २०१८ या तीन महिन्यांसाठी अभय योजना जाहीर केली आहे. ज्या वीजग्राहकांचा वीजपुरवठा ३१ डिसेंबर २०१७ पूर्वी कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. अशा ग्राहकांनी योजनेच्या पहिल्या महिन्यात मूळ थकबाकीची रक्कम भरल्यास त्यांना १०० टक्के व्याज व विलंब आकाराची सवलत मिळणार आहे. १ जुलै २०१८ ते ३१ आॅगस्ट २०१८ या दरम्यान ग्राहकाने मूळ थकबाकीची रक्कम व व्याजाची २५ टक्के रक्कम भरली तर उर्वरित ७५ टक्के व्याज व १०० टक्के विलंब आकाराची माफी ग्राहकाला मिळणार आहे.ग्राहकाला थकबाकीची रक्कम रोख , नेटपेमेंट, चेक या माध्यमातून करता येईल. थकबाकीची रक्कम भरल्यानंतर महावितरणच्या नियमानुसार संबंधित ग्राहकाला वीजजोडणी देण्यात येईल. या अभय योजनेत ज्या ग्राहकाला आपल्या थकबाकीच्या रकमेची माहिती घ्यावयाची आहे अशा ग्राहकांनी महावितरणचे अधिकृत संकेतस्थळावर  जाऊन ग्राहक क्रमांक व बिलिंग युनिट टाकल्यास या योजनेची व ग्राहकाच्या थकबाकीची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. या योजनेत दि. १ जून २०१८ पासून ग्राहकांना सहभागी होता येईल.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर