लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात मान्सून दाखल झाला आहे. परंतु वीज वितरण कंपनी महावितरण कदाचित हे मानायलाच तयार नाही. कारण महावितरणतर्फे अजुनही मान्सूनपूर्व तयारी संपलेली नाही. नियमानुसार मान्सून पूर्व तयारीची कामे ३१ मे पर्यंत संपायला हवीत. परंतु येत्या बुधवारी २६ जून रोजी सुद्धा शहरातील अनेक भागातील वीज बंद ठेवली जाणार आहे. यादरम्यान देखभाल दुरुस्तीचे अत्यावश्यक कामे केली जाणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.पावसाळ्यात वीज पूरवठा सुरळीत रहावा, या कारणासाठी महावितरणतर्फे दर बुधवारी देखभाल दुरुस्तीच्या नावावर वीज बंद ठेवली जात होती. शहरातील नागरिकांनी भविष्यात विजेची समस्या निर्माण होणार नाही, या अपेक्षेने पूर्ण उन्हाळ्यात बुधवारच्या दिवस अनेक तास विजेशिवाय घालवला. महावितरणने अधिक काम असल्याच्या नावावर बुधवारशिवाय इतर दिवशीही आऊटेज (कामासाठी वीज बंद ठेवणे) घेतले. नागरिकांना हा त्रासही सहन केला. परंतु त्यांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाही. साधी हवेमुळेही वीज पूरवठा ठप्प होत आहे. बुटीबोरी येथे रविवारी रात्री पावसामुळे विजेचा खांब वाकला. तो सरळ करण्याचे काम सोमवारी करण्यात आले. पहिल्या पावसातच विजेचा खांब वाकल्या जातो. थोडी हवा आली की वीज पूरवठा खंडीत होतो. जम्पर-कंडक्टर तुटताहेत. विजेचे तार अजुनही लोबकळत आहेत. झाडांच्या फांद्या पहिल्या पावसातच तुटून पडताहेत. तेव्हा महावितरणने मान्सूनपूर्व तयारीत नेमके केले तरी काय? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.सूत्रानुसार मेंटनन्सचे टेंडर काढण्यात आले सल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. दर अधिक असल्याने एजन्सी काम करायला तयारी नाही. गेल्या वेळी टेंर घेणाऱ्या एजन्सीला विनंती करून काम करवून घेतले जात आहे. यामुळे काम प्रभावित झाले. कंपनीकडे पर्याप्त मनुष्यबळ नाही. तसेच यंत्र सामग्रीही नाही. अशा परिस्थितीत महावितरणचा असा दावा आहे की, दर बुधवारी मेंटनन्सचे काम होत आहे. वीज लाईनच्या आजुबाजुला झाडांची संख्या अधिक असल्याने फांद्या छाटण्यात वेळ लागत आहे. फांद्या वाढल्याने त्या वारंवार कापाव्या लागत आहे.बुधवारीही वीज पुरवठा बंददरम्यान अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवार २६ जून रोजी त्रिमूर्तीनगर, जयताळा, जयप्रकाशनगर येथील वीज पुरवठा बंद राहणार असल्याचे महावितरणने कळविले आहे. सकाळी ८ ते ११ या वेळेत जयप्रकाशनगर, गांगुली ले-आऊट, राजीव नगर, राहुलनगर, त्रिमूर्तीनगर, भेंडे ले-आऊट, पन्नासे ले-आऊट, मनीष ले-आऊट, पाटील ले-आऊट, स्वागत सोसायटी, इंद्रप्रस्थनगर, जयबद्रीनाथ, तलमले ले-आऊट, भांगे विहार, शहाणे ले-आऊट, सुर्वेनगर, गावंडे ले आऊट, टेलिकॉमनगर, शंकरनगर, रवींद्रनगर, कापोर्रेशन कॉलनी, बालजगत परिसर, लक्ष्मीनगर, नीरी परिसर येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ७. ३० ते १०. ३० या वेळेत शेगावनगर, शिर्डीनगर, जयहिंद सोसायटी, नरसाळा, बहादुरा, बाबा ताजनगर, मिलन नगर, दीनदयालनगर, स्वावलंबीनगर, पडोळे कॉर्नर, लोकसेवानगर, भामटी, कापसे ले-आऊट, राजापेठ, हुडकेश्ववर, विठ्ठलवाडी येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ७ ते ११ या वेळेत नवजीवन कॉलनी, प्रगती कॉलनी, छत्रपतीनगर, सहकारनगर, प्रशांतनगर, हिंदुस्थान कॉलनी, राहुलनगर, वाडी, दत्तवाडी, सत्यसाई सोसायटी, शिवशक्तीनगर, वेणानगर, आंबेडकरनगर, अंबाझरीचा काही भाग, गिरीपेठ, गोकुळपेठ, धरमपेठ येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ७. ३० ते ११ या वेळेत एकात्मतानगर, पूजा ले-आऊट, दादाजीनगर, कबीरनगर, जनहित सोसायटी, शिवणगाव, भोसले नगर, पंचशीलनगर, बिट्टूनगर, सकाळी ८ ते ९ या वेळेत रामदासपेठ परिसर, सकाळची ८ ते १० या वेळात कुंभारटोली, जोशीवाडी, नागजीभाई टाऊन येथील वीज पुरवठा बंद राहील.
महावितरण :साध्या हवेनेही यंत्रणा कोलमडत आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 20:34 IST
नागपूर शहरात मान्सून दाखल झाला आहे. परंतु वीज वितरण कंपनी महावितरण कदाचित हे मानायलाच तयार नाही. कारण महावितरणतर्फे अजुनही मान्सूनपूर्व तयारी संपलेली नाही. नियमानुसार मान्सून पूर्व तयारीची कामे ३१ मे पर्यंत संपायला हवीत. परंतु येत्या बुधवारी २६ जून रोजी सुद्धा शहरातील अनेक भागातील वीज बंद ठेवली जाणार आहे. यादरम्यान देखभाल दुरुस्तीचे अत्यावश्यक कामे केली जाणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
महावितरण :साध्या हवेनेही यंत्रणा कोलमडत आहे
ठळक मुद्देमान्सून पूर्व तयारी संपतच नाही